---Advertisement---

लॉर्ड्स कसोटी जिंकत WTC गुणतालिकेत भारताचे वर्चस्व, अव्वलस्थानी केला ताबा; इंग्लंड संघ मात्र घसरला

On: बुधवार, ऑगस्ट 25, 2021 2:11 PM
England-vs-India
---Advertisement---

काही दिवसांपूर्वी इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात लीड्स येथे दुसरा कसोटी सामना पार पडला. १५१ धावांनी हा सामना जिंकत भारतीय संघ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. तसेच नुकत्याच पार पडलेल्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील प्रत्येकी 1 सामना जिंकत पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजचा संघ संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. तर अद्याप विजयाचे खाते न खोलू शकलेला इंग्लंडचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात आतापर्यंत भारत, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानने यांनी एक-एक कसोटी जिंकली आहे.

भारताच्या खात्यात दोन कसोटींमध्ये टक्केवारीत 58.33% गुण आहे. तर वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानचे 50 टक्के गुण आहेत.भारत आणि इंग्लंड यांच्यातील ट्रेंट ब्रिज कसोटी अनिर्णित राहिली होती, म्हणून दोन्ही संघांना 4-4 गुण मिळाले होते. पण संथ षटके टाकल्यामुळे आयसीसीने भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांच्या गुणांमध्ये दोन-दोन गुणांची कपात केली होती. यानंतर लॉर्ड्स कसोटी 151 धावांनी जिंकल्यानंतर भारताला एकूण 14 गुण मिळाले आहेत.

कसोटी अंजिंक्यपद स्पर्धेच्या नवीन गुणपद्धती अंतर्गत, यावेळी विजेत्या संघाला टक्केवारीत 100 टक्के गुण (PCT) मिळतील. बरोबरी करणारा संघ 50% गुण मिळवू शकेल. याशिवाय कसोटी अनिर्णित राहिल्यास दोन्ही संघांना 33.33 टक्के गुण मिळतील. सामना खेळून संघांच्या टक्केवारी गुणांच्या आधारावर संघांची क्रमवारी निश्चित केली जाईल.

शाहीन आफ्रिदीची उल्लेखनीय कामगिरी
वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीच्या शानदार कामगिरीमुळे पाकिस्तानने दुसऱ्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी वेस्ट इंडिजचा 109 धावांनी पराभव करत दोन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधली. डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीनने शेवटच्या डावात 43 धावांत चार बळी घेतले. यामूळे 329 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणारा वेस्ट इंडिजचा संघ दुसऱ्या डावात 219 धावांवर सर्वबाद झाला. शाहीन व्यतिरिक्त नौमन अलीने तीन आणि हसन अलीने दोन बळी घेतले.

शाहिनने पाचव्या दिवशी चहाच्या विश्रांतीनंतर जोशुआ डी सिल्वाच्या रूपात शेवटची विकेट घेत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. 21 वर्षीय गोलंदाजाने पहिल्या डावात 51 धावा देऊन सहा बळी घेतले होते आणि दुसऱ्या डावात 6 बळी मिळवले होते. अशाप्रकारे संपुर्ण सामन्यात 94 धावा देऊन 10 बळी घेतले. इतकेच नव्हे तर त्याने मालिकेत 11.28 च्या सरासरीने 18 विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीमुळे तो शेवटच्या सामन्यात सामनावीर आणि मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

महत्त्वाच्या बातम्या-

ना धोनी ना अजून कोणी; भारतीय कसोटी इतिहासात ‘हा’ विक्रम करणारा यष्टीरक्षक पंत असेल पहिलाच

फलंदाजीस पोषक हेडिंग्ले मैदानावर कोहलीकडे २३००० धावा पूर्ण करण्याची सुवर्णसंधी, गरज आहे फक्त…

हेडिंग्लेवर विजयाची हॅट्रिक पूर्ण करण्याची टीम इंडियाला संधी, पाहा कसा आहे आत्तापर्यंतचा रेकॉर्ड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---