fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

टीम इंडियाकडून आज हा खेळाडू करतोय कसोटी पदार्पण, असा आहे ११ जणांचा संघ

रांची। आजपासून (19 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टे़डीयम, रांची येथे होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी भारतीय संघाने 11 जणांच्या संघात शहाबाद नदीमला संधी दिली आहे. त्यामुळे तो या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे. तो भारताकडून कसोटीत पदार्पण करणारा 296 वा खेळाडू ठरला आहे.

त्याला या कसोटीसाठी 11 जणांच्या संघात इशांत शर्मा ऐवजी संधी मिळाली आहे.

विशेष म्हणजे नदीमला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी 15 जणांच्या भारतीय संघात संधी मिळाली नव्हती. परंतू तिसऱ्या कसोटीतून कुलदीप यादव खांद्याच्या दुखापतीने बाहेर पडल्याने त्याचा बदली खेळाडू म्हणून नदीमची निवड करण्यात आली. या निवडीनंतर आज लगेचच त्याला 11 जणांच्या संघातही संधी मिळाली आहे.

त्याचबरोबर तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी दक्षिण आफ्रिका संघाने एडेन मार्करम ऐवजी क्विंटन डीकॉकला सलामीवीर म्हणून आज संधी दिली आहे. तसेच त्यांच्याकडून फिरकीपटू जॉर्ज लिन्ड कसोटी पदार्पण करत आहे. त्याला केशव महाराज ऐवजी संधात संधी मिळाली आहे.

हेन्रीच क्लासेनलाही आज संधी मिळाली असून तो यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळेल. त्याचाही हा दक्षिण आफ्रिकेकडून पहिलाच कसोटी सामना आहे.

दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर फलंदाज मार्करम आणि फिरकीपटू केशव महाराज या कसोटीआधी दुखापतग्रस्त झाल्याने या कसोटीतून बाहेर पडले आहेत.

असे आहेत 11 जणांचे संघ – 

भारत – मयंक अगरवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, वृध्दिमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, शाहबाज नदीम, उमेश यादव, मोहम्मद शमी

दक्षिण आफ्रिका – डीन एल्गार, क्विंटन डी कॉक,  झुबेर हमजा, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), टेंबा बावुमा, हेन्रिच क्लासेन, जॉर्ज लिन्ड, डेन पिडेट, कागिसो रबाडा, एन्रीच नॉर्जे, लुंगी एन्गिडी

You might also like