---Advertisement---

BREAKING! रिंकू आणि प्रसिद्ध कृष्णाचे टी-20 पदार्पण, आयर्लंडविरुद्ध पहिल्या सामन्यात अशी आहे प्लेइंग इलेव्हन

On: शुक्रवार, ऑगस्ट 18, 2023 7:21 PM
Rinku Singh debut in t20i
---Advertisement---

आयर्लंड आणि भारत यांच्यातील पहिला टी-20 सामना शुक्रवारी (18 ऑगस्ट) खेळला जात आहे. भारतीय संघासाठी या आयर्लंड दौऱ्यात प्रसिद्ध कृष्णा आणि रिंकू सिंग यांना या सामन्यात टी-20 पादार्पणाची संधी मिळाली आहे. सोबतच जसप्रीत बुमराह 10महिन्यांपेक्षा अधिक काळानंतर संघात पुनरागमन करत आहे. उभय संघांतील या सामन्याची नाणेफेक भारतीय संघाने जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे भारतासाठी मागच्या मोठ्या काळापासून एकही सामना खेळला नाहीये. सप्टेंबर 2022 मध्ये बुमराहने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना केळला होता. दुखापतीच्या कारणास्तव दरम्यानच्या काळात त्याची मोठी शस्त्रक्रिया पार पडली होती. काही सराव सामन्यांमधील चांगल्या प्रदर्शनानंतर त्याला राष्ट्रीय संघात सामील केले गेले. सोबतच आयर्लंडविरुद्धच्या या टी-20 मालिकेसाठी कर्णधारपद देखील मिळाले. रोहित शर्मा () आणि विराट कोहली  () हे वरिष्ठ खेळाडू आयर्लंड दौऱ्यात विश्रांतीवर आहेत. त्याव्यतिरिक्त संघातील बहुतांश खेळाडू युवा आहेत.

वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा () देखील ऑगस्ट 2022 पाहून एकही सामना खेळला नाहीये. झिम्बाब्वेविरुद्ध खेळलेल्या शेवटच्या सामन्यानंतर जवळपास एका वर्षाने तो मैदानात दिसणार आहे. दुखापतीमुळेच त्याला संघातून बाहेर बसावे लागले होते. रिंकू सिंगसाठी हे केवळ टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पण नसून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हा त्याचा पहिलाच सामना आहे. इंडियन प्रीमियर लीग 2023मध्ये रिंकून कोलकाता नाईट रायडर्ससाठी केलेल्या प्रदर्शनाच्या जोरावर त्याला राष्ट्रीय संघात निवडले गेले आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध एका षटकार पाच षटकार मारून केकेआरला विजय मिळवून दिला होता. (India have won the toss in 1st match against Ireland. Rinku Singh and Prasidh Krishna makeing T20I debut)

पहिल्या टी-20 सामन्यासाठी भारत आणि आयर्लंडची प्लेइंग इलेव्हन –
भारत – ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, वाशिंगटन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, रवी बिश्नोई.

आयर्लंड -पॉल स्टर्लिंग (कर्णधार), एंड्रयू बालबर्नी, लोर्कन टकर (यष्टीरक्षक), हॅरी टेक्टर, जॉर्ज डॉकरेल, बॅरी मॅक्कार्थी, कर्टिस कॅम्फर, मार्क अडायर, जोश लिटिल, बेन व्हाईट, क्रेग यंग.

महत्वाच्या बातम्या –
आशिया चषकासाठी टीम इंडियाच्या संघनिवडीवर सर्वात मोठी अपडेट! लगेच वाचा
BREAKING: एशियन गेम्सआधीच भारतीय खेळाडूवर चार वर्षांची बंदी, होती पदकाची आशा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---