---Advertisement---

निलंबन ते टीम इंडियाचा कर्णधार; तीन वर्षांत उजळले राहुलचे भाग्य

On: सोमवार, जानेवारी 3, 2022 6:38 PM
captain kl rahul
---Advertisement---

दक्षिण अफ्रिका आणि भारत (sa vs ind 2nd test) यांच्यातील दुसरा कसोटी सामना सोमवारी (३ जानेवारी) जोहान्सबर्ग येथे सुरू झाला. सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला (team india) एक मोठा झटका बसला. कसोटी संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली (virat kohli) दुखापत झाल्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात सहभागी होऊ शकला नाही. विराटच्या जागी दुसऱ्या कसोटी सामन्यात केएल राहुल (kl rahul) भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे.

दुसरा सामना सुरू होण्यापूर्वी नाणेफेक करण्यासाठी केएल राहुल जेव्हा आला, तेव्हा विराट या सामन्यात अनुपस्थित असणार आहे, याची माहिती मिळाली. दरम्यान या सामन्यात नेतृत्वाची संधी मिळाल्यानंतर केएल राहुल ३४ वा भारतीय खेळाडू बनला आहे, जो कसोटी संघाचे नेतृत्व करेल.

तसेच राहुल भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व करणारा कर्नाटकचा चौथा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी कर्णाटकच्या गुंडप्पा विश्वनाथ यांनी १९८० मध्ये २ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले होते. सध्याचे संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (rahul dravid) याने २००३ ते २००७ दरम्यान भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सांभाळले आणि यादरम्यान २५ कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व केले. दिग्गज अनिल  कुंबळे यांनी २००७ ते २००८ दरम्यान १४ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले होते.

नाणेफेक करण्यासाठी आल्यानंतर केएल राहुल म्हणाला, “विराट कोहलीच्या पाठीच्या वरच्या भागात वेदना आहेत. तो फिजिओंच्या निरीक्षणात आहे आणि आशा आहे की, पुढच्या कसोटीपर्यंत फिट होईल.” विराट संघातून  बाहेर झाल्यामुळे हनुमा विहारी (hanuma vihari) याला संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले गेले आहे.

तत्पूर्वी, २०१९ मध्ये केएल राहुलच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट काळ आला होता. राहुलने ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर राहुल आणि हार्दिक पंड्याला बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघारी बोलावून घेतले होते आणि निलंबित देखील केले होते. परंतु हाच केएल राहुल आता भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व करत आहे.

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत एकदिवसीय मालिकेतही केएल राहुल करणार संघाचे नेतृत्व

दरम्यान, सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेनंतर उभय संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. एकदिवसीय संघाचे कर्णधारपद स्वीकारल्यानंतर रोहित शर्मा (rohit sharma) त्याच्या पहिल्या एकदिवसीय मालिकेत संघाचे नेतृत्व करू शकणार नाही. रोहितच्या पायाच्या मांसपेशींमध्ये ताण आल्यामुळे तो आगामी एकदिवसीय मालिकेतही सहभागी होऊ शकणार नाही. रोहितच्या अनुपस्थितीत केएल राहुल एकदिवसीय संघाचे नेतृत्व करणार आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना १९ जानेवारीला होईल, तर दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे २१ आणि २३ जानेवारीला खेळला जाईल.

महत्वाच्या बातम्या –

न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रूममध्ये बसलेला ‘तो’ चिमुकला कोण? का होतेय किवी संघाचे कौतुक? वाचा संपूर्ण प्रकरण

कर्णधार बनण्याच्या प्रश्नावर आले स्टोक्सचे उत्तर; म्हणाला, “या जबाबदारीसाठी मी…”

अरेरे! दुखापतीमुळे विराटच्या हातून दवडली मोठी संधी, आता खास ‘शतका’साठी करावी लागणार प्रतिक्षा

व्हिडिओ पाहा –

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---