ग्लासगो येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 पार पडली. 23 जुलैपासून सुरू झालेली ही स्पर्धा 2 ऑगस्टपर्यंत रंगली. या स्पर्धेत 16 क्रीडा प्रकारांमध्ये (ज्यामध्ये 10 सामान्य क्रीडा प्रकार आणि 6 एकत्रित ‘पॅरा-स्पोर्ट्स’चा समावेश आहे) 74 कॉमनवेल्थ गेम्स असोसिएशन्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुमारे 3,000 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. भारताने यंदाच्या स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी केली. स्पर्धेअंती भारत पदकतालिकेत पहिल्या पाचमध्ये आला.
यावर्षीचे भारताचे यश महत्त्वपूर्ण आहे, कारण मागील स्पर्धेत (बर्मिंघम 2022) भारताने ज्या सहा खेळांमध्ये पदके जिंकली होती, त्यांचा यंदाच्या स्पर्धेत समावेश केला नव्हता. तसेच मागील आवृत्तीत भारताने एकूण 30 पदके जिंकली होती आणि यंदा त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
ग्लासगोच्या स्पर्धेत क्रिकेट, टेबल टेनिस, कुस्ती, हॉकी, बॅडमिंटन आणि स्क्वॅश यांचा समावेश नव्हता. या सर्व क्रीडा प्रकारांमध्ये भारताने 2022 च्या आवृत्तीत पदकविजेती कामगिरी केली होती. त्यांचा 2026 च्या आवृत्तीत समावेश नसतानाही भारताने 39 पदके जिंकली, ही एक आश्चर्याचीच बाब आहे. यामध्ये 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे.
भारतीय बॉक्सर्ससी उत्तम कामगिरी करत सर्वाधिक 7 सुवर्णपदके जिंकली. खाली भारताच्या सर्व पदकविजेत्या खेळाडूंची यादी दिली आहे.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारताचे पदक विजेते (CWG 2026, ग्लासगो)
- झंडू कुमार – पॅरा पॉवरलिफ्टिंग, पुरुष हेवीवेट (कांस्य)
- ऋषिकांत सिंग – वेटलिफ्टिंग, पुरुष 60 किलो (रौप्य)
- मीराबाई चानू – वेटलिफ्टिंग, महिला 48 किलो (सुवर्ण)
- मुथुपंडी राजा – वेटलिफ्टिंग, पुरुष 65 किलो (रौप्य)
- ज्ञानेश्वरी यादव – वेटलिफ्टिंग, महिला 53 किलो (रौप्य)
- बिंद्याराणी देवी – वेटलिफ्टिंग, महिला 58 किलो (कांस्य)
- शर्मिला धनकर – पॅरा ॲथलेटिक्स, महिला शॉट पुट F57 (सुवर्ण)
- सर्वेश कुशारे – ॲथलेटिक्स, पुरुष उंच उडी (रौप्य)
- शिल्पा के शायला – पॅरा ॲथलेटिक्स, महिला शॉट पुट F57 (कांस्य)
- वल्लुरी अजय बाबू – वेटलिफ्टिंग, पुरुष 79 किलो (रौप्य)
- हरजिंदर कौर – वेटलिफ्टिंग, महिला 69 किलो (रौप्य)
- गुलवीर सिंग – धावपटू, पुरुष 10,000 मीटर शर्यत (रौप्य)
- मुरली श्रीशंकर – ॲथलेटिक्स, पुरुष लांब उडी (रौप्य)
- दिलीप गावित – पॅरा ॲथलेटिक्स, पुरुष 100 मीटर T47 (सुवर्ण)
- मोहम्मद बासिल – पॅरा ॲथलेटिक्स, पुरुष 100 मीटर T47 (रौप्य)
- लव्हप्रीत सिंग – वेटलिफ्टिंग, पुरुष +110 किलो (रौप्य)
- सीमा कालीरामना – ॲथलेटिक्स, महिला थाळीफेक (कांस्य)
- अस्मिता डे – जुडो, महिला 48 किलो (सुवर्ण)
- हर्ष सिंग – जुडो, पुरुष 60 किलो (सुवर्ण)
- यामिनी मौर्य – जुडो, महिला 57 किलो (रौप्य)
- तेजस्विन शंकर – ॲथलेटिक्स, पुरुष डेकॅथलॉन (कांस्य)
- यश वीर सिंग – ॲथलेटिक्स, पुरुष भालाफेक (कांस्य)
- नीरज चोप्रा – ॲथलेटिक्स, पुरुष भालाफेक (रौप्य)
- प्रीती पवार – बॉक्सिंग, महिला 54 किलो (सुवर्ण)
- प्रवीण चित्रवेल – ॲथलेटिक्स, पुरुष ट्रिपल जम्प (रौप्य)
- सेल्वा प्रभू – ॲथलेटिक्स, पुरुष ट्रिपल जम्प (कांस्य)
- जास्मिन लंबोरिया – बॉक्सिंग, महिला 57 किलो (सुवर्ण)
- जादुमणी सिंग – बॉक्सिंग, पुरुष 55 किलो (रौप्य)
- शुभम जुयाल – पॅरा ॲथलेटिक्स, पुरुष गोळाफेक F57 (रौप्य)
- सोमन राणा – पॅरा ॲथलेटिक्स, पुरुष गोळाफेक F57 (सुवर्ण)
- उन्नती शर्मा – जुडो, महिला 63 किलो (कांस्य)
- साक्षी चौधरी – बॉक्सिंग, महिला 51 किलो (सुवर्ण)
- प्रिया घंघास – बॉक्सिंग, महिला 60 किलो (सुवर्ण)
- अरुंधती चौधरी – बॉक्सिंग, महिला 70 किलो (सुवर्ण)
- लव्हलिना बोरगोहेन – बॉक्सिंग, महिला 75 किलो (रौप्य)
- सचिन सिवाच – बॉक्सिंग, पुरुष 60 किलो (सुवर्ण)
- अंकुश पंघाल – बॉक्सिंग पुरुष 80 किलो (सुवर्ण)
- नरेंद्र बेरवाल – बॉक्सिंग, पुरुष +90 किलो (रौप्य)
- गुलवीर सिंग – ॲथलेटिक्स, पुरुष 5000 मीटर (कांस्य)






