वेस्ट इंडिज संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावो हा गेल्या कित्येक वर्षांपासून इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करतोय. नुकताच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेमुळे त्याला भारतात अफाट लोकप्रियता मिळाली आहे. क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर तो आता नवीन क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान, त्याने भारताविषयी मोठे वक्तव्य केले आहे.
ड्वेन ब्रावोने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केले. क्रिकेट कारकीर्द सुरू असताना त्याने संगीतकार आणि गायक म्हणून देखील एक वेगळी निर्माण केली होती. परंतु, आता तो फॅशन क्षेत्रात देखील आपली नवीन इनिंग खेळायला सज्ज झाला आहे. त्याने ‘डीजेबी ४७ फॅशन लेबल’ ला सुरुवात केली आहे. जो येणाऱ्या वर्षात भारतात देखील लॉन्च करण्यात येणार असून ऑनलाईन सर्वांसाठी उपलब्ध असेल.
त्याने आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “हे माझ्यासाठी खूप खास आहे. कारण मला वाटत नाही की, मी भारताशिवाय ब्रँड बनू शकलो असतो. ही वस्तुस्थिती आहे आणि मला भारताचे आभार मानायचे आहेत. जे माझ्या घरापासून खूप दूर आहे. इथल्या लोकांकडून मला जे प्रेम मिळाले ते माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. हेच कारण आहे की, जेव्हा मी संगीत किंवा क्रिकेटबद्दल बोलतो त्यात नेहमी भारताचा समावेश असतो.”
तसेच आपल्या ब्रँडबद्दल बोलताना ड्वेन ब्रावो म्हणाला की, “मला आधीपासूनच फॅशन क्षेत्रात प्रवेश करायचा होता. कारण मला चांगली ड्रेसिंग करायला आवडतं. आता माझा स्वतःचा ब्रँड असेल आणि लोकांना ते परिधान देखील करायचे आहे. त्यामुळे मला वाटते की, मी योग्य दिशेने वाटचाल करत आहे. मला स्वतःला एक ब्रँड म्हणून बघायचे आहे ज्याच्याशी लोक स्वतःला जोडून घेऊ पाहतील.”
“हा एक ट्रेंडी ब्रँड असेल जो, तरुणांना, लहान मुलांना आणि त्यांच्या आई वडिलांना आकर्षित करेन. मी अशी आशा करतो की, भारतातच नव्हे तर ऑस्ट्रेलिया, यूके, कॅरिबिया आणि यूएससारख्या ठिकाणीही या ब्रँडचा विस्तार होईल.”
महत्वाच्या बातम्या :
मन जिंकलस भावा! ‘आरसीबी’चा जयघोष करणाऱ्या चाहत्यांना सिराजचा इशारा ‘इंडियाला चीअर करा’- Video
भारीच ना!! वामिकाचा वाढदिवस होणार खास; विराट लाडक्या लेकीला देणार खास भेट