---Advertisement---

मन जिंकलस भावा! ‘आरसीबी’चा जयघोष करणाऱ्या चाहत्यांना सिराजचा इशारा ‘इंडियाला चीअर करा’- Video

On: बुधवार, डिसेंबर 8, 2021 12:05 PM
Mohammed-Siraj
---Advertisement---

भारतीय संघाने २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंड संघाला १-० ने धूळ चारत मालिका आपल्या नावावर केली होती. या मालिकेत भारतीय युवा खेळाडूंनी जोरदार कामगिरी केली होती, तर न्यूझीलंड संघाचा फिरकीपटू एजाज पटेलने दुसऱ्या सामन्यातील दुसऱ्या सामन्यात १० गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता. दरम्यान, या सामन्यातील मोहम्मद सिराजचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजने अप्रतिम गोलंदाजी करत न्यूझीलंडचा मुख्य क्रम उध्वस्त केला होता. त्यानंतर भारतीय संघातील फिरकी गोलंदाजांनी न्यूझीलंड संघाचा डाव ६२ धावांवर संपुष्टात आणला होता.

हा सामना संपल्यानंतर सर्व चाहते मोहम्मद सिराजचा उत्साह वाढवताना दिसून आले होते. त्यानंतर मोहम्मद सिराजने चाहत्यांकडे पाहत फ्लायिंग किस देण्याचा इशारा केला आहे. त्यानंतर चाहते ‘आरसीबी…आरसीबी’ अशा घोषणेसह जल्लोष करताना दिसून आले.

मोहम्मद सिराज हा आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघाचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे चाहते त्याच्यासमोर आरसीबीचा जयघोष करत होते. हे मोहम्मद सिराजच्या निदर्शनात येताच त्याने भारतीय जर्सीकडे बोट दाखवले आणि भारतीय संघाला चीयर करण्यास सांगितले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच चाहते त्याचे कौतुक देखील करत आहे.

https://twitter.com/Araviee_offl/status/1468170797831245824

भारतीय संघाचा ३७२ धावांनी विजय 
भारतीय संघाने हा सामना जिंकण्यासाठी न्यूझीलंड संघाला ५४० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाकडून डॅरील मिशेलने सर्वाधिक ६० धावांची खेळी केली. तर हेनरी निकोलसने ४४ धावांचे योगदान दिले. इतर कुठल्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करत आली नाही. न्यूझीलंड संघाचा संपूर्ण डाव अवघ्या १६७ धावांवर संपुष्टात आला. हा सामना भारतीय संघाने ३७२ धावांनी आपल्या नावावर केला.

महत्वाच्या बातम्या :

“आम्हाला आयपीएलचे आजोबा म्हणून हिणवले गेलेले, पण आम्ही…”; सीएसकेच्या खेळाडूने बोलून दाखवले शल्य

ऐतिहासिक वनडे द्विशतकाला १० वर्षे पूर्ण; आजच्याच दिवशी सेहवागने काढली होती विंडीज गोलंदाजांची पिसं

न्यूझीलंडला धक्का! केन विलियम्सन ‘इतक्या’ दिवस राहणार क्रिकेटपासून दूर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---