नुकताच भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने १-० विजय मिळवत मालिका खिशात घातली होती. आता लवकरच भारतीय संघ दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध कसोटी मालिकेत दोन हात करणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना २६ डिसेंबर म्हणजेच ‘बॉक्सिंग डे’ला सुरू होणार आहे. या मालिकेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा करण्यात येणार आहे. तत्पूर्वी, भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघातील मुख्य खेळाडू रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, अक्षर पटेल आणि शुबमन गिल दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यांना पूर्णपणे फिट होण्यासाठी काही महिन्यांचा अवधी लागू शकतो. त्यामुळे या खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते.
तसेच न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रवींद्र जडेजा आणि ईशांत शर्मा दुखापतीमुळे संघाबाहेर होते. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, रवींद्र जडेजाला लिगमेंट टियरचा त्रास होत आहे, तर ईशांत शर्माचा बोटची दुखापत झाली आहे. रवींद्र जडेजाला दुखापतीतून बाहेर येण्यासाठी काही महिने लागू शकतात.
रवींद्र जडेजाच्या अनुपस्थित अक्षर पटेलने न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. पण, त्याला देखील स्ट्रेस फ्रेक्चर झाला आहे. त्यामुळे त्याला पूर्णपणे फिट होण्यासाठी कमीत कमी ६ ते ७ आठवड्यांचा अवधी लागू शकतो. हे दोघेही डाव्या हाताचे गोलंदाज उपलब्ध नसले, तर आर अश्विनला मुख्य फिरकी गोलंदाजाची भूमिका पार पाडावी लागू शकते.
तसेच भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल याचे देखील दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणे कठीण दिसून येत आहे. न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी मालिकेत त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. इंग्लंड दौऱ्यावर ही गिलला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला दौरा सोडावा लागला होता. मुंबई कसोटीतही त्याच्या डाव्या हाताला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याने क्षेत्ररक्षण केले नव्हते आणि दुसऱ्या डावात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला होता.
महत्वाच्या बातम्या :
मुंबई कसोटीतील शतकानंतरही दक्षिण आफ्रिकेत मंयक असेल राखीव पर्याय, माजी प्रशिक्षकांनी सांगितले कारण
कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात कमिन्सची ऐतिहासिक कामगिरी; ५९ वर्षांनतर केलाय ‘असा’ कारनामा
मन जिंकलस भावा! ‘आरसीबी’चा जयघोष करणाऱ्या चाहत्यांना सिराजचा इशारा ‘इंडियाला चीअर करा’- Video