---Advertisement---

कर्णधारानंतर भारताचा प्रशिक्षक म्हणून द्रविड फेल! संघाला लवकरच मिळू शकतो नवीन कोचिंग स्टाफ

On: सोमवार, डिसेंबर 5, 2022 6:20 PM
rohit-sharma-rahul-dravid
---Advertisement---

भारतीय संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर असून संघाला पहिल्या एकदिवसीय सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. संघाने नुकत्याच पार पडलेल्या टी-20 विश्वचषकात उपांत्य सामन्यात इंग्लंडकडून 10 विकेट्सने पराभव स्वीकारला. टी-20 फॉरमॅटमध्ये संघ अपेक्षित प्रदर्शन करताना दिसत नाहीये आणि याच पार्श्वभूमीवर बीसीसीआय काही मोठे बदल करू शकते. बीसीसीआयच्या एखा वरिष्ठ सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी महिन्यात भारताला टी-20 क्रिकेटसाठी नवीन कर्णधार आणि सपोर्ट स्टाफ मिळू शकतो. 

माध्यमांमध्ये अशा बातम्या काही दिवसांपूर्वी आल्या होत्या की, हार्दिक पंड्या लवकरच भारताच्या टी-20 संघाचा नियमित कर्णदार होणार आहे. भारतीय संघाला जानेवारी महिन्यात श्रीलंका संघाविरुद्ध टी-20 मालिका खेळायची आहे. यापूर्वी हार्दिककडे ही जबाबदारी दिली जाणार असल्याचे सांगितले गेले आहे. अशातच आता अशीही माहिती समोर येत आहे की, श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेपूर्वी भारताला टी-20 फॉरमॅटसाठी नवीन प्रशिक्षक मिळू शकतात. राहुल द्रविड (Rahul Dravid) सध्या चांगले काम करत असले, तरी वेगळ्या फॉरमॅटसाठी संघाला प्रशिक्षक देखील वेगळे हवे आहेत, असे एका बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितले. अशात टी-20 संघाचे प्रशिक्षक आणि राहुल द्रविड एकत्र कारण करतील.

बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही यावर गंभीरतेने विचार करत आहोत. राहुल द्रविडच्या क्षमतेपेक्षा हा मुद्दा संघाचे व्यस्त वेळापत्रक आणि त्या क्षेत्रातील तज्ञांचा संघासोबत जोडण्याविषयी आहे. आम्हालाही बदल करण्याची गरज आहे. आम्ही जानेवारीआधी नवीन कर्णधाराची नियुक्ती करणार आहोत. तसेच संघाला नवीन प्रशिक्षक देखील मिळू शकतात. पण याविषयी अद्याप काहीच निश्चित झाले नाहीये.”

दरम्यान, भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग यांनी देकील संघाला टी-20 फॉरमॅटमध्ये वेगळे प्रशिक्षक गरजेचे आहेत, असे म्हटले होते. यावर्षीच्या टी-20 विश्वचषकात भारताला अपयश मिळाले असले तरी, संघ पुढच्या विश्वचषकासाठी आतापासून तयारीला लागणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून संघ ही तयारी सुरू करेल. यादरम्यान संघात खूप काही बदल होणार असल्याचेही सांगितले जात आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली टी-20 संघातून बाहेर होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. (India is likely to get a new captain and coach ahead of the T20I series against Sri Lanka)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आपल्याच खेळाडूला कोट्यावधी कमावण्यापासून रोखत आहेत ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक, वाचा संपूर्ण प्रकरण
ऑस्ट्रेलियन संघात ‘या’ दोन फास्ट बॉलर्सची एंट्री, दोघेही करतात वाऱ्याच्या वेगाने गोलंदाजी 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---