जगभरात कोरोना व्हायरसने खळबळ उडवली आहे. त्याचा सर्वात मोठा फटका क्रिडा जगताला बसला आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाने अनेक आंतरराष्ट्रीय मालिका रद्द करण्यात आल्या. यात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया या वनडे मालिकांचा समावेश आहे.
12 मार्चपासून सुरु झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना पावसाच्या कारणाने रद्द झाला. त्यापुढील 2 सामने बीसीसीआयने कोरोनाच्या कारणामुळे रद्द केले. मात्र, दक्षिण आफ्रिका संघ पुन्हा एकदा भारत दौऱ्यावर येणार आहे. पण अद्यापही याची तारिख जाहीर झालेली नाही.
तर, न्यूझीलंडविरुद्दच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 71 धावांनी शानदार विजय मिळवला होता. परंतु, उर्वरित 2 सामनेही कोरोनाच्या कहरने रद्द करण्यात आले.
यानंतर आयसीसीने वनडे क्रमवारी यादी जाहीर केली आहे. यात संघाच्या क्रमवारी यादीत इंग्लंडचा संघ भारताहून 6 गूणांनी पुढे असल्याने अव्वल स्थानावर कायम आहे. तर, 118 गुणांसह भारत दुसऱ्या स्थानावर आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा वनडे सामन्यात जरी पराभव झाला असला, तरी 116 गुणांसह न्यूझीलंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर, ऑस्ट्रेलिया 110 गुणांसह 5व्या क्रमांकावर आहे. शिवाय दक्षिण आफ्रिका 112 गुणांमुळे चौथ्या क्रमांकावर आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
– टीम इंडियाचा सदस्य नसलेला धोनी खेळतोय हा खेळ
– जड्डूला सर म्हटल्यावर नक्की वाटतं तरी काय?
– गोष्ट एका क्रिकेटरची: तेव्हा ऑनर बोर्डवर नाव न लागलेल्या…