न्यूझीलंडमध्ये सध्या आयसीसी महिला वनडे विश्वचषक २०२२ (ICC Women ODI World Cup) चा थरार सुरू आहे. ४ मार्चपासून या स्पर्धेची सुरुवात झाली आहे. या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी कट्टर प्रतिद्वंद्वी भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) यांचा सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने ७ विकेट्सच्या नुकसानावर २४४ धावा केल्या. प्रत्युत्तरात या आव्हानाचा बचाव करताना भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या संघाला १३७ धावांवरच रोखले आणि तब्बल १०७ धावांच्या फरकाने हा सामना जिंकला. यासह भारताने पाकिस्तानविरुद्ध अजेय राहण्याचा (India 100% Winning Record Against Pakistan) विक्रम कायम ठेवला आहे.
भारताने कायम राखला पाकिस्तानवरील १०० टक्के विजयाचा विक्रम
या महत्त्वपूर्ण सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी निवडली होती. मात्र पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भारताच्या ५ फलंदाजांना एकेरी धावसंख्येवर बाद केले. असे असले तरीही, पूजा वस्त्राकार, स्म्रीती मंधाना आणि स्नेह राना यांच्या अर्धशतकी खेळीमुळे भारतीय संघाने २०० पेक्षा जास्त धावा फलकावर लावल्या.
Brilliant win for #TeamIndia!
The partnership between Sneh & Pooja got us back in the game when we were 114/6. The best thing the two did was to rotate strike smartly & convert 2s into 3s & didn’t miss out on putting loose deliveries away.
Their mindset helped us win.#INDvPAK pic.twitter.com/BxDLU3yTa9
— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 6, 2022
मंधानाने सलामीला फलंदाजी करताना ७५ चेंडूंमध्ये ५२ धावा केल्या. तिने तिच्या खेळीदरम्यान १ षटकार आणि ३ चौकार ठोकले. मंधानाबरोबरच दिप्ती शर्मानेही ४० धावांचे तुफानी खेळी केली. त्यानंतर स्वस्तात एकमागोमाग विकेट्स पडत असताना खालच्या फळीत स्नेह साना आणि पूजा वस्त्राकार यांनी शानदार अर्धशतके केली. तसेच त्या दोघींमध्ये सातव्या विकेटसाठी शतकी भागिदारीही झाली. स्नेह ५३ धावांवर नाबाद राहिली. तर पूजाने ६७ धावांची शानदार खेळी केली. अशाप्रकारे ३ फलंदाजांच्या अर्धशतकी खेलीच्या जोरावर पाकिस्तानला २४५ धावांचे आव्हान दिले.
भारताच्या २४५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची एकही फलंदाज अर्धशतक करू शकल्या नाहीत. पाकिस्तानकडून सलामीवीर सिद्रा अमीनने सर्वाधिक ३० धावा केल्या. भारतीय गोलंदाज राजेश्वरी गायकवाडच्या शानदार गोलंदाजी प्रदर्शनामुळे भारतीय संघ पाकिस्तानला १३७ धावांवरच रोखण्यात यशस्वी ठरला. राजेश्वरीने केवळ ३१ धावा देत पाकिस्तानच्या ४ फलंदाजांना बाद केले.
अशाप्रकारे भारताने पाकिस्तानवर अतिशय सोपा विजय मिळवला. या विजयासह भारताने पाकिस्तानविरुद्धचा १०० टक्के विजयाचा विक्रम अबाधित राखला आहे. हा उभय संघातील ११ वा वनडे सामना (India’s 11th ODI Win Against Pakistan) होता. भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्धचे हे अकराच्या ११ सामने जिंकले आहेत.
विशेष म्हणजे, भारताने पाकिस्तानविरुद्ध आतापर्यंत जितके वनडे सामने खेळले आणि जिंकले आहेत, त्या प्रत्येक सामन्यात मिताली राज भारतीय संघाची सदस्य होती.
महत्त्वाच्या बातम्या-
इंडिया लिजेंड्सचा फ्रेंडशिप कपमध्ये मानहानिकारक पराभव; वर्ल्ड लिजेंड्सचा तब्बल ७३ धावांनी विजय
रविंद्र जडेजासोबत शेन वॉर्नचे नाते होते खूप खास, सीएसकेने शेअर केला जुना फोटो
विश्वचषकात मिताली ‘राज’! पाकिस्तानविरुद्ध मैदानात पाय ठेवताच भारतीय कर्णधाराने रचला विश्वविक्रम