---Advertisement---

इंडिया लिजेंड्सचा फ्रेंडशिप कपमध्ये मानहानिकारक पराभव; वर्ल्ड लिजेंड्सचा तब्बल ७३ धावांनी विजय

On: रविवार, मार्च 6, 2022 2:10 PM
---Advertisement---

सध्या संयुक्त अरब अमिरात येथे फ्रेंडशिप कप (Friendship Cup 2022) ही क्रिकेट स्पर्धा खेळली जात आहे. यामध्ये पहिल्या दिवशी इंडिया लिजेंड्स विरुद्ध वर्ल्ड लिजेंड्स असा सामना खेळला गेला. मोहम्मद अजहरुद्दिन (Mohammad Azharuddin) यांच्या नेतृत्वात खेळणाऱ्या इंडिया लिजेंड्स संघाला या सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. वर्ल्ड लिजेंड्स संघाने १० षटकांच्या सामन्यात तब्बल ७३ धावांनी विजय मिळवला.

या सामन्यात वर्ल्ड लिजेंड्स संघाने प्रथम फलंदाजी करताना १० षटकात १३९ धावा चोपल्या. फिल मस्टर्ड व तिलकरत्ने दिलशान यांनी अनुक्रमे २८ व १८ धावा काढत संघाला चांगली सलामी दिली.‌ त्यानंतर फलंदाजीला आलेला अफगाणिस्तानचा माजी कर्णधार इंडिया लिजेंड्सच्या गोलंदाजांवर बरसला. त्याने अवघ्या १८ चेंडूमध्ये ५ चौकार व तीन षटकारांच्या मदतीने ४८ धावा काढल्या. अखेरीस हॅमिल्टन व जुपिटर यांनी उपयुक्त योगदान देत संघाला १३९ पर्यंत मजल मारून दिली. भारतासाठी इम्तियाज अहमद यांनी दोन तर अजय शर्मा यांनी एक बळी मिळविला.

या धावांचा पाठलाग करताना इंडिया लिजेंड्स संघ स्पर्धेतही दिसला नाही. स्वतः कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने अत्यंत कूर्मगतीने फलंदाजी केली. तो १९ चेंडूमध्ये केवळ १३ धावा बनवू शकला. अजय शर्मा १५, जेपी यादव २२ व इम्तियाज अहमद सात धावांवर माघारी परतले. नयन मोंगिया २ तर, मोहम्मद अजहरुद्दिन यांचा मुलगा मोहम्मद असदुद्दीन केवळ तीन धावा करू शकला. अशाप्रकारे इंडिया लिजेंड्स संघ केवळ ६६ धावा बनवू शकला. वर्ल्ड लिजेंड्स संघासाठी ग्रिम क्रेमर याने तीन तर चामिंडा वास व तिलकरत्ने दिलशान यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

महत्वाच्या बातम्या-

अश्विन कसोटीतील महान भारतीय गोलंदाज बनण्याच्या वाटेवर, ४ विकेट्स घेत कपिल देवची केली बरोबरी (mahasports.in)

दोन आठवडे दारूच्या थेंबालाही नव्हतं शिवलं; शेन वॉर्नच्या निधनानंतर मॅनेजरचा दावा (mahasports.in)

भारीच! स्नेह राणा-पुजा वस्त्राकर जोडीची पाकिस्तानविरुद्ध कमाल, एकाच वेळी दोन विश्वविक्रम नावावर (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---