भारतीय संघ विश्वचषक 2023 स्पर्धेत तुफान फॉर्ममध्ये आहे. भारताने पहिले पाचही सामने जिंकले आहेत. अशात भारत आपला सहावा सामना रविवारी (दि. 29 ऑक्टोबर) लखनऊ येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडिअम येथे इंग्लंडविरुद्ध खेळत आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. तसेच, भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यावेळी मात्र भारताची सुरुवात खूपच खराब झाली. भारतीय संघाला पॉवरप्लेमध्येच दोन झटके बसले.
आधी गिल, मग विराट
नाणेफेक गमावत फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी शुबमन गिल (Shubman Gill) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) मैदानात उतरले होते. यावेळी भारताला डावाच्या चौथ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर पहिला धक्का बसला. हे षटक इंग्लंडकडून ख्रिस वोक्स (Chris Woaks) टाकत होता. त्याने अखेरच्या चेंडूवर शुबमन गिल याचा त्रिफळा उडवला. त्यामुळे गिलला 13 चेंडू खेळून 9 धावांवर तंबूचा रस्ता पकडावा लागला. यावेळी गिलने 1 चौकारही मारला.
त्यानंतर तिसऱ्या स्थानी फलंदाजीसाठी विराट कोहली (Virat Kohli) उतरला. विराटही खास कामगिरी करू शकला नाही. त्याला डेविड विली (David Willey) याने सातव्या षटकातील पाचव्या चेंडूवर बेन स्टोक्स याच्या हातून झेलबाद केले. विराटने यावेळी 9 चेंडूंचा सामना केला, पण त्याला भोपळाही फोडता आला नाही.
First one down 🙌
Chris Woakes gets Shubman Gill with the inswinger!
🇮🇳 2️⃣6️⃣-1️⃣#EnglandCricket | #CWC23 pic.twitter.com/LNkrJe18cP
— England Cricket (@englandcricket) October 29, 2023
असं पहिल्यांदाच घडलं, जेव्हा विराट कोहली मर्यादित षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत शून्यावर बाद झाला. त्याची विश्वचषकात 56 डावांमध्ये शून्यावर बाद राहण्याची मालिका खंडित झाली. विराट कोहली आयसीसी सामन्यात अखेरचा 2017मध्ये श्रीलंकेविरुद्ध शून्यावर बाद झाला होता.
श्रेयसचीही पडली विकेट
यानंतर डावातील 12व्या षटकातील पाचव्या चेंडूवर ख्रिस वोक्स याने श्रेयस अय्यरलाही तंबूचा रस्ता दाखवला. अय्यर यावेळी खराब शॉट खेळून मार्क वूड याच्या हातून झेलबाद झाला. त्याला यावेळी 16 चेंडूत फक्त 4 धावा करता आल्या.
विराट बाद झाला, तेव्हा भारतीय संघाची धावसंख्या 2 बाद 27 धावा इतकी होती. भारताने पॉवरप्लेमध्ये 2 विकेट्स गमावत फक्त 35 धावा केल्या. (India lose 2 wickets in powerplay against england in world cup 2023 29th match)
हेही वाचा-
विश्वचषक 2023मध्ये भारत पहिल्यांदाच करणार ‘हे’ काम, इंग्लंडने जिंकला टॉस; Playing XIमध्ये नाही कोणताच बदल
हारलेल्या सामन्यातही न्यूझीलंडने घडवला इतिहास! विश्वचषकात ‘असा’ जबरदस्त पराक्रम करणारा पहिलाच संघ