Monday, March 27, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

घरच्या मैदानावर सव्वाशेरच! दहा वर्षापासून मायदेशात टीम इंडियाच बादशाह

February 11, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/Virat Kohli

Photo Courtesy: Twitter/Virat Kohli


भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूर येथे पार पडला. पाच दिवसांचा कसोटी सामना भारताने तिसऱ्याच दिवशी खिशात घातला. या सामन्यात भारताने एक डाव आणि 132 धावांनी मोठा विजय साकारला. या विजयासह भारतीय संघाने मागील दहा वर्षातील मायदेशातील कसोटी जिंकण्याची परंपरा कायम राखली.

जागतिक क्रमवारीत पहिल्या दोन स्थानी असलेल्या या दोन्ही संघादरम्यान अटीतटीची लढत होण्याची शक्यता होती. मात्र, नागपूर येथील या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने अजिबात संघर्ष केला नाही. पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया केवळ 177 धावा करू शकला. त्यानंतर भारतीय संघाने कर्णधार रोहित शर्मा, रवींद्र जडेजा व अक्षर पटेल यांच्या फलंदाजीच्या जोरावर 400 धावा उभ्या केल्या. भारतीय संघाला पहिल्या डावात 223 धावांची आघाडी मिळाली.  या आघाडीच्या दबावात ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या डावात सपशेल अपयशी ठरला. रविचंद्रन अश्विन याने घातक गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा डाव केवळ 91 धावांवर संपवण्यात मोठी भूमिका बजावली. एक डाव 132 धावांनी मिळवलेल्या या विजयासह भारताने मालिकेत आघाडी घेतली.

या विजयासह भारतीय संघाने मागील दहा वर्षापासून कसोटी क्रिकेटमध्ये असलेले मायदेशातील आपले वर्चस्व कायम राखले. भारताने 2013‌ पासून मायदेशात 43 सामने खेळले असून त्यापैकी 35 सामन्यात संघाने विजय मिळवला आहे. तर सहा सामने हे अनिर्णीत राहिले आहेत. भारताला या दहा वर्षात केवळ दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाने 2017 दौऱ्यावेळी तर इंग्लंडने 2022 मध्ये भारताला पराभूत करण्याची किमया केली होती.

भारतीय संघासाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. कारण, ही मालिका भारतीय संघाने दोन विजयांच्या फरकाने जिंकल्यास संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरी प्रवेश करेल. या अंतिम सामन्यात भारताची पुन्हा गाठ ऑस्ट्रेलियाशी पडण्याशी शक्यता आहे.

(India Lost Just Two Test On Home Soil Since 2013)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

मोहम्मद शमीची आश्चर्यकारक आकडेवारी, कसोटीत ठोकलेत विराट आणि द्रविडपेक्षा जास्त षटकार
भारत वि. ऑस्ट्रेलिया : पहिल्या कसोटीत भारताचा शानदार विजय, पाहुण्या संघाची धुळधाण उडवत मालिकेत 1-0 अशी आघाडी


Next Post
R-Ashwin

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अश्विनचे विक्रमी 'शतक', यादीत 'हा' भारतीयच अव्वलस्थानी

Rohit-Sharma-Century

गुरू सचिनला मागे टाकत रोहितने गाठले विक्रमाचे शिखर! वीरू तर राहिला दूरवरच

Australia-Team

पहिल्या कसोटीतील पराभवानंतर समोर आली ऑस्ट्रेलियाची नकोशी आकडेवारी, पाहून भारतीयांना होईल आनंद

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143