जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर नुकताच पार पडला. १८ ते २३ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंडच्या संघात हा सामना खेळवला गेला. शेवटच्या दिवसापर्यंत हा सामना चुरशीने खेळला गेला. मात्र अखेरच्या दिवशी वरचढ खेळ करत न्यूझीलंडने बाजी मारली. आता त्यामुळे अनेकांनी भारतीय संघावर टीका केली असून भारताच्या पराभवाची कारणे देखील सांगितले आहे. भारताच्या एका माजी क्रिकेटपटूने देखील यात उडी घेतली आहे.
‘त्या’ एका तासामुळे गमावला सामना
भारतीय संघाला या अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून ८ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. या सामन्यात अखेरच्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली तेव्हा भारतीय संघ २ बाद ६४ अशा सुस्थितीत होता. आणि त्यांच्याकडे ३२ धावांची आघाडी होती. मात्र पहिल्या एका तासात त्यांनी कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा या दोन महत्वाच्या फलंदाजांच्या विकेट्स गमावल्या. यामुळेच न्यूझीलंडला सामन्यात पुनरागमन करणे शक्य झाले. आता भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने देखील भारतीय संघाने याच एका तासामुळे सामना गमावला, असे विधान केला आहे.
“दोन वर्षांच्या मेहनतीवर एका तासाने फेरले पाणी”
आकाश चोप्राने एका क्रीडा संकेतस्थळासाठी लिहिलेल्या लेखात म्हंटले की, “हा भारतीय संघ गेली पाच वर्षे सातत्याने कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी राहिला आहे. मात्र दुर्दैवाने इतिहास तो एक तास लक्षात ठेवेल, ज्यासाठी भारताने कोणतीही योजना आखली नव्हती. संघ आणि कर्णधारांना त्यांनी जिंकलेल्या ट्रॉफींद्वारे ओळखले जाते. त्यामुळे तुम्ही युद्ध जिंकू शकला नाही तर किती लढाया जिंकल्या, याला महत्व राहत नाही.”
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज कायले जेमिसनने या एका तासात कोहली आणि पुजारा या दोन महत्वाच्या फलंदाजांची शिकार केली. या मिळालेल्या संधीचा फायदा घेत न्यूझीलंडने भारताचा उर्वरित डाव देखील लवकर गुंडाळला. आणि शेवटच्या सत्रात मिळालेले १३९ धावांचे लक्ष्य अवघे दोन गडी गमावून गाठले. यासह केन विलियम्सनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडने कसोटी क्रिकेटच्या सर्वोच्च विजेतेपदाची गदा पटकावली. तर कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाच्या पदरी निराशाच पडली.
महत्त्वाच्या बातम्या –
पुन्हा WTC मध्ये भिडणार भारत-न्यूझीलंड, ‘या’ महिन्यात खेळवली जाणार मालिका
VIDEO: झेल घेण्यासाठी चाहत्याने बाथटबमधून मारली उडी आणि पुढे घडले असे काही






