---Advertisement---

भारताने घेतलीये विश्वविजेत्यांची मज्जा! पहिल्या वनडेत हवेत उडणाऱ्या इंग्लंडला आदळलंय जमिनीवर

Hardik-Pandya-Rohit-TeamIndia
---Advertisement---

इंग्लंड आणि भारत या दोन संघांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका मंगळवार १२ जुलै पासून सुरू झाली. कसोटी सामन्यात धमाकेदार प्रदर्शन केल्यानंतर भारताने इंग्लंडली तीन टी२० सामन्यांच्या मालिकेत पराभूत केले. मात्र, कसोटी सामना गाजवणारे जो रुट, जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स यांच्या पुनरागमनानंतर इंग्लंडचा संघ भारताला एकदिवसीय सामन्यात टक्कर देईल अशी अपेक्षआ होती. मात्र, भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला केवळ ११० धावांवर १० बाद अशा न्यूनतम धावांवर रोखले. आणि विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. 

भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी भारतीयं संघात अपेक्षेप्रमाणे प्रत्येक खेळाडूचा समावेश झाला. केवळ दुखापतीच्या कारणाने विराट कोहलीला संघआबाहेर राहावे लागले. त्याच्या जागी श्रेयस अय्यरला संघात सामील करून घेतले. यावेळी मात्र भारताचा संघ इंग्लंडच्या तुलनेत थोडाफार कमकुवत दिसत होता. मात्र, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शामी या गोलंदाजी जोडीने पहिल्या षटकापासूनत इंग्लंडच्या फलंदाजांना जेरीस आणले.

बुमराहने त्याच्या पहिल्या आणि सामन्याच्या दुसऱ्याच षटकात इंग्लंडच्या दोन फलंदाजांना बाद केले. त्यानंतर मात्र, इंग्लंडच्या कोणत्याही फलंदाजाला जास्त काळ खेळपट्टीवर टिून राहता आले नाही. यावेळी इंग्लंडच्या जेसन रॉय, जो रुट, बेन स्टोक्स आणि लियाम लिव्हिंगस्टोन या चार फलंदाजांना एकही धाव काढता आली नाही. इंग्लंडसाठी या सामन्यात जोस बटलर याने सर्वाधिक ३० धावा केल्या आणि पहिल्या डावा अखेरिस इंग्लंडला केवळ ११० धावाच करता आल्या.

दरम्यान, भाराताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने या सामन्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करत आपल्या ७.२ षटकात केवळ १९ धावा देत ६ बळी घेतले. जी आजवरच्या क्रिकेट इतिहासातील भारतासाठी एकजिवसीय सामन्यात तियऱअया क्रमांकाची सर्वोत्तम गोलंदाजी ठरली. शिवाय मोहम्मद शामीने फेकलेल्या ७ षटकांत ३१ धावा देत ३ बळी आपल्या नावे केले. त्यामुळे आता भारताला हा सामना जिंकण्यासाठी केवळ ११ धावांची आवश्यकता आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

बुमराह अन् शमीने पार धुव्वा केलाय! एक-दोन नाही इंग्लंडच्या तीन फलंदाजांना धाडलंय शून्यावर तंबूत

‘मला विश्वचषक खेळायचा आहे, त्यामुळे…’, भारतीय संघात परतल्यानंतर शिखर धवनचे मोठे विधान

पेढे वाटा पेढे! केकेआरच्या ‘या’ क्रिकेटरच्या घरी आला नवा पाहुणा, पत्नीने गोंडस मुलाला दिला जन्म

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---