---Advertisement---

BREAKING: अभूतपूर्व गोंधळानंतरही कबड्डीचे गोल्ड भारताकडेच, इराणची झुंज अपयशी

---Advertisement---

चीनमधील हॅंगझू येथे सुरू असलेल्या एशियन गेम्स स्पर्धेत शनिवारी (7 ऑक्टोबर) स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदकांचा धडाका लावला. बॅडमिंटन, तिरंदाजी व क्रिकेटमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर भारताच्या पुरुष कबड्डी संघाने देखील सुवर्णपदकावर कब्जा केला. अत्यंत वादग्रस्त झालेल्या या अंतिम सामन्यात भारतीय संघाने इराणला 32-29 असे पराभूत करून आठव्यांदा सुवर्णपदक जिंकले.

सुवर्णपदकाचे दावेदार असलेला भारत व मागील एशियन गेम्समधील सुवर्ण पदक विजेता इराण या अंतिम सामन्यात समोरासमोर आलेले. दोन्ही संघांदरम्यान अखेरपर्यंत काट्याची लढत झाली. सामना संपण्यासाठी दीड मिनिट शिल्लक असताना दोन्ही संघ 28-28 अशा बरोबरीत होते. त्यावेळी भारतीय कर्णधार पवन सेहरावत हा रेड मारण्यासाठी गेला.

मात्र तो कोणत्याही खेळाडूला स्पर्श न करता लॉबीमध्ये गेला. त्याच्यामागे अफगाणिस्तानचे चार खेळाडू देखील लॉबीमध्ये आले. त्यावेळी पंचांनी दोन्ही संघांना 1-1 गुण दिले. त्यावर भारतीय संघाने आक्षेप घेतला. त्यानंतर पंचांनी निर्णय बदलत भारताच्या बाजूने 4-1 असा निर्णय दिला. त्यावर इराणने विरोध नोंदवला. पुन्हा गुण 1-1 असे केले गेले. भारताच्या या विरोधानंतर सामना जवळपास एक तास थांबवला गेला. मोठ्या वादा नंतर पुन्हा खेळ सुरू झाला तेव्हा भारताच्या बाजूने निर्णय दिला गेलेला. अखेर उर्वरित एका मिनिटाचा खेळ पार पडला तेव्हा भारतीय संघाने 32-29 असा विजय संपादन केला. एशियन गेम्स स्पर्धेतील कबड्डीमधील हे भारताचे 8 वे सुवर्णपदक आहे.

(India Mens Kabaddi Team Won Gold In Asian Games Best Iran In Finals)

हेही वाचा-

BREAKING: क्रिकेटमध्येही यंग इंडियाने कमावले गोल्ड, ऋतुराजच्या नेतृत्वात घडला इतिहास 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---