रविवारी (दि. 22 ऑक्टोबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघ धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडिअममध्ये विश्वचषक 2023 स्पर्धेतील 21व्या सामन्यासाठी आमने-सामने आले आहेत. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर झालेल्या दोन्ही देशांच्या राष्ट्रगीता दरम्यान भारताचे राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर हा आवाज हिमालयाच्या सर्व पहाडांमध्ये घुमू लागला.
https://x.com/mufaddal_vohra/status/1716031172785139731?s=20
जगातील सर्वाधिक उंचीवरील क्रिकेट स्टेडियम असलेल्या एचपीसीए क्रिकेट स्टेडियमवर भारताचा हा विश्वचषकातील एकमेव सामना आहे. हिमालयाच्या कुशीत असलेल्या धौलाधर पहाडांमध्ये वसलेल्या या स्टेडियमवर भारताचे राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर वेगळाच माहोल तयार झालेला दिसला. मैदानावर हजर असलेल्या जवळपास 25 हजार भारतीय प्रेक्षकांनी एकासुरात हे राष्ट्रगीत म्हटले. त्यावेळी हा आवाज पहाडांमध्ये इकोच्या स्वरूपात चांगलाच घुमला.
मागील आठवड्यात अहमदाबाद येथे झालेल्या भारत पाकिस्तान सामन्यातही जवळपास एक लाखापेक्षा जास्त भारतीय प्रेक्षकांनी तसेच राष्ट्रगीत म्हटलेला व्हिडिओ व्हायरल झालेला.
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत-
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
न्यूझीलंड-
डेवॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक/कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिशेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट
(India National Anthem Echo At HPCA Stadium In India v Newzealand Match)
हेही वाचा-
क्या बात है! अवघ्या 9 धावांवर न्यूझीलंडला बसला पहिला धक्का, सिराजने ‘असा’ काढला कॉनवेचा काटा
IND vs NZ Toss: महत्त्वाच्या सामन्यात रोहितने जिंकली नाणेफेक, पंड्यासह ‘या’ खेळाडूला केलं संघाबाहेर