ऑकलँड। न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात आज(24 जानेवारी) पहिला टी20 सामना इडन पार्क येथे सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 5 बाद 203 धावा केल्या आहेत. तसेच भारताला विजयासाठी 204 धावांचे आव्हान दिले आहे.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र न्यूझीलंडचे सलामीवीर फलंदाज मार्टिन गप्टिल आणि कॉलिन मुन्रो यांनी 8 षटकातच 80 धावांची सलामी भागीदारी रचली. मात्र गप्टिल 30 धावांवर बाद झाल्याने ही जोडी फुटली.
पण त्यानंतर केन विलियम्सनने मुन्रोला चांगली साथ दिली. मात्र 59 धावावंर असताना मुन्रोला शार्दुल ठाकूरने बाद केले. यानंतर विलियम्सनने न्यूझीलंडच्या फलंदाजीची जबाबदारी घेत अर्धशतक पूर्ण केले. त्याने 26 चेंडूत 51 धावांची खेळी केली.
विलियम्सन बाद झाल्यानंतर रॉस टेलरने शेवटच्या काही षटकात आक्रमक फलंदाजी करताना न्यूझीलंडला 200 धावांचा आकडा पार करुन दिला. त्याने 27 चेंडूत नाबाद 54 धावा केल्या.
भारताकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, शिवम दुबे आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
…म्हणून राफेल नदालने किस करत मागितली बॉर्ल गर्लची माफी, पहा व्हिडिओ
वाचा👉https://t.co/cu3sUAz99q👈#म #मराठी #AO2020 #AusOpen #ballgirl #RafaelNadal #Tennis @RafaelNadal— Maha Sports (@Maha_Sports) January 24, 2020
टॉप ५: भारत-न्यूझीलंड टी२० मालिकेत होऊ शकतात हे खास विक्रम…
वाचा👉https://t.co/GQVRYJGHQV👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvNZ— Maha Sports (@Maha_Sports) January 24, 2020