---Advertisement---

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन महिला 261वर All Out, भारतीय रणरागिणी इतिहास घडवण्यापासून ‘एवढ्या’ धावा दूर

Indian-Women-Team
---Advertisement---

INDW vs AUSW: भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघातील एकमेव कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअम येथे खेळला जात आहे. रविवारी (दि. 24 डिसेंबर) सामन्याचा चौथा दिवस आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यापर्यंत 5 विकेट्स गमावत 233 धावा केल्या होत्या. त्यांच्याकडे 46 धावांची आघाडी होती. मात्र, ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव चौथ्या दिवशी 261 धावांवर संपुष्टात आला. त्यांना एकूण 74 धावांची आघाडी मिळाली. अशाप्रकारे भारतीय संघाला विजयासाठी 75 धावांचे आव्हान मिळाले आहे.

भारताकडे इतिहास घडवण्याची संधी
भारतीय संघाकडे हे आव्हान पार करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ आहे. जर भारतीय संघ हे आव्हान पार करण्यात यशस्वी झाला, तर हा भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीतील पहिला विजय ठरेल.

ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव
ऑस्ट्रेलिया महिला संघाला सामन्याच्या चौथ्या दिवशी पहिला झटका ऍश्ले गार्डनर हिच्या रूपात बसला. ती 27 चेंडूत 7 धावा करून बाद झाली. पूजा वस्त्राकर हिच्या चेंडूवर ती पायचीत बाद झाली. तिच्यानंतर एनाबेल सदरलँड 27 धावा करून स्नेह राणाची शिकार झाली. स्नेहने पुन्हा एलाना किंग (शून्य) हिचा त्रिफला उडवला. राजेश्वरी गायकवाडने लॉरेन चीटल (4) हिला बाद करत ऑस्ट्रेलियाला 9वा झटका दिला. गायकवाडने जेस जोनासन (9) हिला बाद करत ऑस्ट्रेलियाला सर्वबाद केले.

https://twitter.com/BCCIWomen/status/1738792764811419818

तत्पूर्वी ऑस्ट्रेलियासाठी दुसऱ्या डावात ताहलिया मॅकग्रा 73, एलिस पेरी 45 आणि बेथ मूनी 33 धावा करून बाद झाल्या. कर्णधार एलिसा हिली (Alyssa Healy) 32 धावा आणि फीबी लिचफील्ड 18 धावा करून बाद झाल्या. भारतासाठी दुसऱ्या डावात स्नेह राणा हिने 4 विकेट्स घेतल्या. राजेश्वरी गायकवाड आणि हरमनप्रीत कौर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. पूजा वस्त्राकर हिने एक विकेट नावावर केली.

यापूर्वी पहिल्या डावात भारताने 406 धावा आणि ऑस्ट्रेलियाने 219 धावा केल्या होत्या. भारताला पहिल्या डावात 187 धावांची आघाडी मिळाली होती. भारतासाठी पहिल्या डावात दीप्ती शर्माने 78, स्मृती मंधानाने 74, जेमिमा रॉड्रिग्जने 73 आणि ऋचा घोषने 52 धावा केल्या होत्या. तसेच, ऑस्ट्रेलियासाठी पहिल्या डावात ताहलिया मॅकग्राने 50 आणि बेथ मूनीने 40 धावा केल्या होत्या. भारतासाठी पूजा वस्त्राकरने 4 आणि स्नेह राणाने 3 विकेट्स नावावर केल्या होत्या. (India need 75 runs to register their first-ever Test win against Australia)

हेही वाचा-
INDvsSA पहिल्या कसोटीसाठी गावसकरांनी निवडली जबरदस्त Playing XI, ‘या’ स्टार खेळाडूंना मिळाली जागा
‘माझा एक पाय नकली…’, दुखापतग्रस्त असूनही मजा-मस्ती करायला विसरला नाही सूर्या, पाहा मजेदार Video

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---