भारत आणि इंग्लंड यांच्यात ओव्हल मैदानावर सुरू असलेला चौथा कसोटी सामना रोमांचक वळणावर आला आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडचा संघ २९० धावांवर गुंडाळला. मात्र, यजमान ९९ धावांची आघाडी घेण्यात यशस्वी ठरले आहेत. पहिल्या डावात केवळ १९१ धावांवर सर्वबाद झालेल्या भारतीय संघाने दुसऱ्या डावात चांगली सुरुवात केली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने एकही विकेट न गमावता ४३ धावा केल्या आहेत. केएल राहुल २४ आणि रोहित शर्मा २० धावा करून खेळत आहेत. तरीही इंग्लंडकडे आता ५६ धावांची आघाडी आहे. जर भारताला हा कसोटी सामना जिंकायचा असेल; तर किमान २५० धावांची आघाडी घ्यावी लागेल.
चौथ्या डावात या मैदानावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारताच्या नावावर आहे. १९७९ मध्ये, इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाने या मैदानावर ८ गडी गमावून ४२९ धावा करून सामना अनिर्णित राखला होता. या सामन्यात चौथ्या डावात सुनील गावसकर यांनी २२१ धावांची मॅरेथॉन खेळी खेळली होती. याशिवाय १९४७ मध्ये दक्षिण आफ्रिकेनेही या मैदानावर चौथ्या डावात सात विकेट गमावून ४२३ धावा करत सामना अनिर्णित राखला होता.
इंग्लंड संघाविषययी बोलायचे झाले तर, १९०२ साली संघाने ओव्हल मैदानावर २६३ धावा करूनही सामना जिंकला होता. याशिवाय इंग्लंड संघ या मैदानावर दोनदा चौथ्या डावात ३०० पेक्षा जास्त धावा करून सामना वाचवण्यात यशस्वी झाला आहे. २००७ साली राहुल द्रविडच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाविरुद्ध इंग्लंडने चौथ्या डावात सहा विकेट गमावून ३६९ धावा करून सामना अनिर्णित केला होता. याशिवाय १९६५ मध्ये इंग्लंड संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथ्या डावात चार गडी गमावून ३०८ धावा केल्या होत्या.
त्यामुळे जर भारताला हा कसोटी सामना जिंकायचा असेल, तर दुसऱ्या डावात किमान ३५० धावा कराव्या लागतील. यामुळे इंग्लंडला चौथ्या डावात जिंकण्यासाठी २५० धावांचे लक्ष्य मिळेल.
महत्त्वाच्या बातम्या-
पोप-अलीची भागिदारी तोडण्यासाठी कोहलीचा जडेजासंगे ‘मास्टरप्लान’ अन् पुढच्याच चेंडूवर खेळ खल्लास
‘बेटा, तू फक्त मोहालीत असं करून दाखव, मग पाहा’; वारंवार मैदानात घुसणाऱ्या जार्वोला सेहवागचा इशारा