---Advertisement---

भारत-नेदरलँड्स सामन्यात पाऊस बनणार का खलनायक? असा असेल सिडनीचा मौसम

On: बुधवार, ऑक्टोबर 26, 2022 10:52 PM
Rahul Rohit Virat
---Advertisement---

आयसीसी टी20 विश्वचषक 2022 च्या आपल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघ गुरुवारी (27 ऑक्टोबर) नेदरलँड्सशी दोन हात करेल. सिडनी क्रिकेट मैदानावर (SCG) हा सामना खेळला जाईल. मात्र, स्थानिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सामन्याच्या दिवशी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मंगळवारी झालेल्या पावसामुळे सामन्यादरम्यान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.

एका हवामान संकेतस्थळाच्या माहितीनुसार, या सामन्यात पावसाची शक्यता नाही. स्थानिक वेळेनुसार या सामन्याला सायंकाळी सहा वाजता सुरुवात होईल. त्यावेळी तापमान 12% ढगांच्या आवरणासह 19-23 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. परंतु, गुरुवारी संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मात्र, पावस येण्याची शक्यता नगण्य आहे. तरीदेखील, पावसाची शक्यता पूर्णपणे नाकारता येणार नाही.
एका क्रिकेट संकेतस्थळाने दिलेल्या अहवालानुसार, सिडनीची खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त ठरेल. वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीवर योग्य लाईन आणि लेन्थने गोलंदाजी करावी लागेल. दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघासाठी फलंदाजी सोपी होईल. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. भारत आणि नेदरलँड्स या सामन्यात याच मैदानावर बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा सामना देखील होणार आहे.

विश्वचषकासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, रिषभ पंत, अक्षर पटेल, हर्षल पटेल, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह.

विश्वचषकासाठी नेदरलँड्स संघ-
स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), कॉलिन अकरमन, विक्रम सिंग, शरीझ अहमद, टॉम कूपर, बास डी लीड, ब्रँडन ग्लोव्हर, फ्रेड क्लासेन, स्टीफन मायबर्ग, मॅक्स ओ’डॉड, टिम प्रिंगल, लोगन व्हॅन बीक, टिम व्हॅन डर गुगेन, रुलोफ व्हॅन डर मर्वे, पॉल व्हॅन मीकेरेन.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इतिहास कायम राहिला! विश्वचषकात आयर्लंडविरुद्ध इंग्लंड नेहमीच होते टाय-टाय फिस्स
टी20 क्रमवारीत पहिल्या स्थानाकडे विराटची आगेकूच, सूर्या-बाबरला मागे टाकत नवा खेळाडू दुसऱ्या क्रमांकावर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---