मेलबर्न। भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरु आहे. या सामन्यात भारताचा आक्रमक फलंदाज रोहित शर्माने पहिल्या डावात 114 चेंडूत नाबाद 63 धावा केल्या आहेत. यात त्याने 5 चौकार मारले.
हे रोहितचे कसोटी क्रिकेटमधील 27 सामन्यातील 10 वे अर्धशतक आहे. विशेष म्हणजे रोहित जेव्हाही कसोटी सामन्यातील एका डावात नाबाद राहिला आहे तेव्हा भारत कधीही सामना पराभूत झालेला नाही.
याआधी रोहित कसोटीमध्ये 26 सामन्यात 6 वेळा नाबाद राहिला आहे. त्यातील 4 सामने भारताने जिंकले आहेत, तर 2 सामने अनिर्णित राहिले आहेत.
त्यामुळे रोहितचे मेलबर्न कसोटीतील नाबाद अर्धशतक भारतीय संघाला लकी ठरणार का हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
या सामन्यात भारताने पहिला डाव 7 बाद 443 धावांवर घोषित केला. तसेच ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 151 धावांतच संपुष्टात आला आहे. भारताकडून या डावात जसप्रीत बुमराहने 6 विकेट्स घेत महत्त्वाची कामगिरी बजावली.
तिसऱ्या दिवसाखेर भारतीय संघाने दुसऱ्या डावात 5 बाद 54 धावा केल्या आहेत. या डावात भारताकडून मयंक अगरवाल 28 आणि रिषभ पंत 6 धावांवर नाबाद खेळत आहे. या दुसऱ्या डावात मात्र रोहितला खास काही करण्यात अपयश आले. तो 5 धावांवर असताना जोश हेजलवूडच्या गोलंदाजीवर बाद झाला.
महत्त्वाच्या बातम्या:
–…तर रोहित शर्मा करणार मुंबई इंडियन्सच्या संघात टिम पेनचा समावेश
–ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू बरळलाच, शतकवीर पुजाराच्या खेळीवर टीका
–विजय- राहुलला जे ८ डावात जमलं नाही ते मयांक अगरवालने २ डावात करुन दाखवलं