भारतीय संघ २६ डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) पहिला कसोटी सामना खेळणार आहे. ही कसोटी मालिका भारतासाठी खूप महत्त्वपूर्ण असेल. कारण भारतीय संघ आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत एकदाही कसोटी मालिका जिंकू शकला नाही. दक्षिण आफ्रिकेची खेळपट्टी स्विंग, गती आणि उसळणाऱ्या चेंडूंसाठी ओळखली जाते. दक्षिण आफ्रिकेला भारतीय संघाने भारतीय जमिनीवर १९९६ मध्येच हरवलं आहे. पण ते दक्षिण आफ्रिकेत एकदाही कसोटी मालिका नाही जिंकू शकले.
२००६ मध्ये जिंकला दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामना
राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) कर्णधारपदात असताना भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत पहिला कसोटी सामना जिंकला होता. या सामन्यात श्रीशांत हिरो ठरला होता. त्याने आक्रमक गोलंदाजी करून दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची पळता भुई थोडी केली होती. या सामन्यात त्याने ८ विकेट्स घेतल्या होत्या आणि तो सामनावीर देखील ठरला होता. पहिल्या डावांत श्रीशांतने ४० धावा देऊन ५ विकेट्स घेतल्या होत्या.
ऑस्ट्रेलियामध्ये जिंकली २०१८-१९ मध्ये पहिल्यांदा कसोटी मालिका
ऑस्ट्रेलियाला भारताने भारतीय जमिनीवर १९७९ मध्ये कसोटी मालिकेत हरवलं होतं पण ऑस्ट्रेलियात भारत २०१८-१९ मध्ये पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकली. विराट कोहली (Virat Kohli) ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकणारा पहिला कर्णधार बनला. चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) या मालिकेत खूप धावा केल्या होत्या. त्याने ४ कसोटी सामन्यात ७४.४३ च्या सरासरीने ५२१ धावा केल्या होत्या आणि जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) ४ कसोटीत २१ विकेट्स घेतल्या होत्या.
२००४ मध्ये पाकिस्तानमध्ये जिंकली पहिली कसोटी मालिका
भारतीय संघाचा २००४ चा पाकिस्तान दौरा अविस्मरणीय होता. भारतीय संघाने वनडे मालिकेसोबत कसोटी मालिका देखील जिंकली होती. सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) कर्णधारपदात पहिल्यांदा भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका जिंकली होती. हा दौरा वीरेंद्र सेहवागसाठी (Virender Sehwag) अविस्मरणीय होता. तो भारताकडून त्रिशतक झळकावणारा पहिला फलंदाज बनला.
वेस्ट इंडीज दौऱ्याच्या पहिल्या कसोटी मालिका विजयाच्या आठवणी
१९७१ मध्ये भारत वेस्ट इंडीज दौऱ्यावर ५ कसोटी सामने खेळायला गेला होता. तसे या दौऱ्यात भारताकडून जास्ती अपेक्षा नव्हत्या. भारतीय संघाचा कर्णधार अजित वाडेकर (Ajit Wadekar) होता. भारताने पोर्ट ऑफ स्पेन (Port of Spain) मधल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ७ विकेट्सने वेस्ट इंडीज वर विजय मिळवला होता. ही मालिका वेस्ट इंडिज मध्ये जिंकलेली भारताची पहिलीच मालिका होती. मालिकेतले बाकीचे सामने अनिर्णित राहिली होती. त्यामुळे भारताने १-० अश्या फरकाने ही मालिका जिंकली.
वाडेकर यांनी जिंकवली इंग्लंडमध्ये कसोटी मालिका
१९७१ हे वर्ष भारतीय संघासाठी अविस्मरणीय होतं. भारताने वेस्ट इंडीज पाठोपाठ इंग्लंडमध्ये देखील कसोटी मालिका जिंकली होती. या दौऱ्यावर सुद्धा भारताचे कर्णधार अजित वाडेकरच होते. या मालिकेत ३ सामने खेळवले जाणार होते. पहिले २ सामने अनिर्णित राहिले.
ओवलवर तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताला विजय प्राप्त करता आला होता. या कसोटी सामन्यात चंद्रशेखर यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली. त्यांनी ३८ धावा देऊन ६ विकेट्स घेतल्या होत्या. इंग्लंड दुसरा डाव १०१ धावांवरच आटोपला. भारताला हा सामना आणि कसोटी जिंकण्यासाठी १७३ धावांची गरज होती. भारताने हा कसोटी सामना ४ विकेट्सने जिंकला होता.
याशिवाय भारताने न्यूझीलंडमध्ये १९६७ मध्ये, श्रीलंका मध्ये १९९३ तर बांग्लादेशमध्ये २००० मध्ये पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
मातब्बर गोलंदाज झुलन गोस्वामीच्या बायोपिकमधून बाहेर झाली विराटची पत्नी अनुष्का शर्मा, पण का?
कसोटीत एका डावात १० विकेट्स घेणारा एजाज आयपीएल खेळण्याबाबत म्हणाला असं काही, वाचा