बॉलीवूड अभिनेत्री (Bollywood Actress) आणि कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) बद्दल एक बातमी आली आहे. अनुष्का शर्मा भारतीय महिला गोलंदाज झुलन गोस्वामीच्या बायोपिकचा भाग राहिलेली नाही. सुरुवातीला या बायोपिकमध्ये अनुष्का शर्मा झुलन गोस्वामीच्या भूमिकेत दिसणार होती. झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) वनडेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी महिला गोलंदाज आहे. तिला पद्मश्री आणि अर्जुन अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, अनुष्का शर्मा आता झुलन गोस्वामीच्या भूमिकेत नाही दिसणार. तसेच अनुष्का शर्माने चित्रपट न करण्याचं कारण अद्याप स्पष्ट केलं नाहीय. या चित्रपटाचे निर्माते अनुष्काचे क्लीन स्लेट फिल्मस (Clean Slate Films) आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद एल राय (Anand L Rai) आहेत. झीरो चित्रपटानंतर अनुष्काचा चित्रपट परीचं दिग्दर्शन प्रोसित रॉय (Prosit Roy) यांनी केलं होतं. जर अनुष्काने हा चित्रपट केला असता, तर हा तिचा आनंद एल रायसोबत दुसरा मोठा चित्रपट असता.
अनुष्का झुलन गोस्वामीच्या बायोपिकमध्ये काम करणार, हे तेव्हा समजलं जेव्हा अनुष्का आणि झुलनच्या चित्रीकरणाचे कोलकाताच्या इडन गार्डन्सवरचे (Eden Gardens) फोटो चाहत्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. काही फोटोमध्ये दिग्दर्शक रॉय सुद्धा दिसून आले होते. आता हेत दिग्दर्शक चित्रपटासाठी नवीन चेहरा शोधण्याची शक्यता आहे. झुलन गोस्वामीचा बायोपिक नेटफ्लिक्स (Netflix)वर रिलीज करण्यात येईल.
झुलनला २००७ मध्ये वर्षातली सर्वोत्कृष्ट आयसीसी महिला खेळाडू (ICC Women’s Player of the year) म्हणून निवडलं गेलं होतं. २००२ साली भारतीय संघाकडून पदार्पण केलेल्या झुलनने अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला. आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक बळींचा विक्रम नावावर असलेल्या झुलनने गेल्या दशकभर भारतीय महिला संघाच्या वेगवान माऱ्याची धुरा समर्थपणे सांभाळली. काही काळ तिने भारतीय संघाचं नेतृत्वही केलं आहे. आता याच झुलनच्या बायोपिकमध्ये कोणती अभिनेत्री तिची भूमिका साकारते, हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटीत एका डावात १० विकेट्स घेणारा एजाज आयपीएल खेळण्याबाबत म्हणाला असं काही, वाचा
काळजात धस्स करवणारी बातमी! श्रीलंकेच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये हत्तीचा हल्ला, दोघांचा मृत्यू
रोहित वनडेचा कॅप्टन बनताच ‘या’ ३ खेळाडूंच्या स्थानावर असेल टांगती तलवार! विराटचे आहेत लाडके शिलेदार