ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात गुरुवारी (10 नोव्हेंबर) भारत आणि इंग्लंड (INDvENG) यांच्या दरम्यान दुसरा उपांत्य फेरीचा सामना खेळला गेला. भारतीय संघाने सांघिक कामगिरीच्या जोरावर उभारलेल्या 168 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने आपल्या दोन्ही सलामीवीरांच्या शानदार खेळाचा जोरावर भारताला 10 गड्याने पराभूत करत अंतिम फेरीत जागा मिळवली. या पराभवासह भारतीय संघाचा आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा दुष्काळ आणखी लांबला.
अंतिम फेरीचा प्रबळ दावेदार म्हणून मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने या सामन्यात खराब सुरुवात केली. मात्र, विराट कोहली व हार्दिक पंड्या यांनी शानदार अर्धशतके करत भारतीय संघाला निर्धारित 20 षटकात 168 पर्यंत मजल मारून दिली. या धावांचा पाठलाग करताना जोस बटलर व ऍलेक्स हेल्स यांनी भारतीय गोलंदाजांना कोणतीही संधी न देता केवळ 16 षटकात एकही गडी बाद न होऊ देता या धावा गाठून दिल्या. यासह इंग्लंडने उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यामुळे मागील 9 वर्षापासून भारतीय संघाचा सुरू असलेला आयसीसी विजेतेपदाचा दुष्काळ कायम राहिला.
भारतीय संघाने इंग्लंडमध्ये 2013 साली झालेल्या चॅम्पियन ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर भारताने चार टी20 विश्वचषक खेळले. त्यापैकी एका विश्वचषकात (2014 टी20 विश्वचषक) भारताला अंतिम फेरीत, तर दोन विश्वचषकांच्या (2016 व 2022 टी20 विश्वचषक) उपांत्य फेरीत भारतीय संघाला पराभूत व्हावे लागले. 2021 टी20 विश्वचषकाच्या पात्रता फेरीतच भारतीय संघ बाहेर पडला होता.
तर 2015 व 2019 वनडे विश्वचषकांच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाला पराभूत व्हावे लागले होते. तर, 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी व 2021 जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताला विजेतेपद मिळवण्यात अपयश आलेले. भारताला आता आपले पुढील आयसीसी विजेतेपद मिळवण्यासाठी पुढील वर्षी भारतातच होणाऱ्या वनडे विश्वचषकाची वाट पहावी लागेल. (India Not Winning ICC Trophy Since 2013)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! भारतात क्रिकेटचा पाया रचणारा दिग्गज हरपला, चाहते दु:खात
युवराज सिंगच्या मोठ्या विक्रमाला धक्का! खास यादीत हार्दिक पंड्या पोहोचला पहिल्या क्रमांकावर






