भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका (India Tour Of South Africa) दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये सध्या सेंचुरियन येथे पहिली कसोटी (Centurion Test) खेळली जात असून, भारतीय संघ यामध्ये आघाडीवर आलेला दिसून येतोय. त्याच वेळी तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर उभय संघादरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाईल. या मालिकेसाठी भारतीय संघाची अद्याप निवड झाली नाही. आता या निवडीबाबत एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे
का होत नाही भारतीय संघाची संघनिवड?
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवड समितीने अद्याप वनडे संघाची निवड केली आता याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली असून, ती संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याशी निगडित आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रोहित शर्माची कसोटी संघाचा उपकर्णधारपदी निवड झाली होती. मात्र, संघ दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्याच्या काही दिवस आधी सरावादरम्यान तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे तो कसोटी संघासोबत दक्षिण आफ्रिकेला जाऊ शकला नाही. सध्या तो बेंगलोर येथे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) आपल्या तंदुरुस्तीवर काम करतोय. रोहित कधीही पूर्णपणे तंदुरुस्त होतो, यावर सर्वांचे लक्ष आहे. ज्यावेळी रोहित तंदुरुस्त होईल त्यावेळी या संघाची निवड केली जाऊ शकते. (Rohit Sharma Fitness)
हे खेळाडू ही असू शकतात अनुपस्थित
रोहितसह या मालिकेसाठी संघाचे प्रमुख अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) व अक्षर पटेल (Axar Patel) हेदेखील संघ निवडीसाठी उपलब्ध नसतील, असे एका बीसीसीआय (BCCI) अधिकार्याने सांगितले आहे. त्यामुळेच संघ निवडीला उशीर होतोय. तरीही संघनिवड ३० किंवा ३१ डिसेंबर रोजी करण्याचा आमचा प्रयत्न राहील. असे या अधिकार्याने म्हटले.
तर घेतला जाऊ शकतो हा निर्णय
रोहित या दौऱ्यासाठी तंदुरुस्त न झाल्यास निवड समिती मोठा निर्णय घेऊ शकते. रोहित अनुपलब्ध असल्यास या दौऱ्यावर संघाचा उपकर्णधार केएल राहुल संघाचे नेतृत्व करू शकतो. राहुल याची नुकतीच वनडे व टी२० संघाचा उपकर्णधार म्हणून निवड झाली आहे. विशेष म्हणजे निवड समिती व भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने विराट कोहलीला हटवून रोहित शर्मा याची वनडे संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
२०२१ गाजवणारे टॉप टी२० फलंदाज; भारतीयांनी केली सपशेल निराशा (mahasports.in)