टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या सुपर 12 फेरीतील शेवटचा सामना भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघात रविवारी (दि. 06 नोव्हेंबर) खेळला जाणार आहे. मेलबर्न येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्यापूर्वी नाणेफेक झाली. यामध्ये भारतीय संघाने विजय मिळवत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे, भारतीय संघात या सामन्यासाठी एक बदल करण्यात आला आहे. दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याच्या जागी रिषभ पंत (Rishabh Pant) याला संधी मिळाली आहे.
दुसरीकडे, झिम्बाब्वे संघातही दोन बदल करण्यात आले आहेत. वेलिंग्टन मसाकादझा आणि टोनी मुन्योंगा यांना संघात सामील करण्यात आले आहे. तसेच, मिल्टन शुंबा हा खूपच संघर्ष करत होता. त्याच्या जागी झिम्बाब्वेने टोनीला संधी दिली. ल्यूक जोंगवे दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याच्या जागी फिरकीपटू वेलिंग्टनला संघात घेतले.
🚨 Toss & Team Update 🚨@ImRo45 has won the toss & #TeamIndia have elected to bat against Zimbabwe in Melbourne. #T20WorldCup | #INDvZIM
Follow the match 👉 https://t.co/shiBY8Kmge
1⃣ change to our Playing XI as @RishabhPant17 is named in the team 🔽 pic.twitter.com/J8gFfFv4cv
— BCCI (@BCCI) November 6, 2022
भारतीय संघ
केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग
झिम्बाब्वे संघ
वेस्ली मधेवेरे, क्रेग एर्विन (कर्णधार), रेगिस चकाब्वा (यष्टीरक्षक), शॉन विलियम्स, सिकंदर रझा, टोनी मुन्योंगा, रायन बर्ल, तेंडाई चतारा, रिचर्ड नगारवा, वेलिंग्टन मसाकादझा, ब्लेसिंग मुझरबानी
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गोलंदाजांनी रोखलं, फलंदाजांनी चोपलं! बांगलादेशला नमवत पाकिस्तानची सेमी फायनलमध्ये एन्ट्री
द. आफ्रिका पुन्हा चोक! नेदरलँड्सकडून पराभूत होऊन नामुष्कीरित्या विश्वचषकातून बाहेर