आशिया चषकातील शेवटच्या लीग सामन्यात पाकिस्तानी संघाने हाँगकाँगचा दारून पराभव करत सुपर4 मध्ये आपले स्थान निश्चित केले. यावेळी पाकिस्तानी संघाने हाँगकाँगवर तब्बल 155 धावांनी मात केली. प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानने 20 षटकांत 2 बाद 193 धावा केल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरात हाँगकाँग संघ अवघ्या 38 धावांवर सर्वबाद झाला.
विशेष म्हणजे या सामन्यात विजय मिळवल्यानंतर पाकिस्तान संघाने आशिया चषकाच्या सुपर 4 फेरीत प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे आता येत्या रविवारी (4 सप्टेंबर) रोजी क्रिकेट रसिकांना पुन्हा एकदा भारत- पाकिस्तान यांच्यातील रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे एका स्पर्धेत एका आठवड्याच्या अंतरातच पहिल्यांदाच क्रिकेटचाहत्यांना असा दुग्धशर्करा योग चाखायला मिळणार आहे.
या सामन्याबाबत बोलायचे झाल्यास या सानमन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 193 धावा रचल्या यावेळी पाकिस्तानी संघाचा सलामीवीर मोहम्मद रिजवान याने 78 आणि फखर झमान याने 53 धावांची अर्दशतकी खेळी करत पाकिस्तानला सामन्यात विशेष स्थानावर पोहोचवले. त्यानंतर गोलंदाजी मध्ये उपकर्णधार शादाब खानने सर्वाधिक 4 तर मोहम्मद नवाजने ३ आणि नसीम शाहने २ बळी घेऊन हाँगकाँग संघाला गुडघे टेकण्यास भाग पाडले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंडला मोठा झटका! रॉय अन् आर्चरनंतर आता आणखी एक दिग्गज टी-20 विश्वचषक संघातून बाहेर
अल्टिमेट खो खो स्पर्धेत प्रतीक वाईकरच्या कामगिरीमुळे तेलगु योद्धाज संघाची आगेकूच
ऑस्ट्रेलियाला एकाच खेळाडूत मिळाला हार्दिक आणि पोलार्ड! मुंबई इंडियन्ससोबत खास कनेक्शन