---Advertisement---

‘भारत-पाकिस्तान सामना उशीरा सुरू करा’ रवि शास्त्रींची अजब मागणी

On: मंगळवार, ऑगस्ट 23, 2022 5:08 PM
---Advertisement---

भारत-पाकिस्तान महामुकाबल्यापूर्वी अनेक दिग्गज आपापली मते शेअर करत आहेत. अनेकजण निरनिराळे सल्ले देत आहेत. अशा परिस्थितीत भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीतर थेट सामना उशीरा सुरू करण्याची मागणी केली आहे. मुळात सामन्यात केवळ एकाच संघाला दव परिस्थितीचा फायदा मिळू नये यासाठी त्यांनी ही मागणी केली आहे.

“तुम्हाला दव समस्या कायमस्वरूपी सोडवायची असेल तर तुम्ही सामना अशा वेळी सुरू केला पाहिजे जेव्हा दव आहे. जेणेकरून दोन्ही संघांसाठी परिस्थिती सारखीच राहील. तथापि, हे करण्यासाठी, तुम्हाला टेलिव्हिजनवरील सामन्याच्या वेळेशी जुळवून घ्यावे लागेल”, असे सांगत शास्त्रींनी सामन्याबाबत एक विशेष सल्ला दिला आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आशिया चषकापूर्वी आयसीसी क्रमवारीत भारत-पाकिस्तानमध्ये टक्कर! पाहा दोन्ही संघांची ताजी आकडेवारी
‘आता आयपीएल तेव्हाच खेळेल, जेव्हा…’; बेन स्टोक्सने केले महत्वाचे विधान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---