Sunday, January 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतासाठी 2011, पाकिस्तानसाठी 1992; यावेळी टी20 वर्ल्ड कपमध्ये कोणाच्या योगायोगाचे पारडे जड, घ्या जाणून

भारतासाठी 2011, पाकिस्तानसाठी 1992; यावेळी टी20 वर्ल्ड कपमध्ये कोणाच्या योगायोगाचे पारडे जड, घ्या जाणून

November 7, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
Dhoni & Rohit & Babar & Imran

Photo Courtesy: Twitter/ ICC


टी20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) आठव्या हंगामासाठी शेवटचे चार संघ निश्चित झाले आहेत. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबरला खेळले जाणार आहेत. या फेरीसाठी भारताबरोबर पाकिस्तान, इंग्लंड आणि न्यूझीलंड संघ पात्र ठरले आहेत. उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी (10 नोव्हेंबर) तर पाकिस्तानचा न्यूझीलंडशी (9 नोव्हेंबर) होणार आहे. या स्पर्धेत भारताचा प्रवास उल्लेखनीय तर पाकिस्तानचा आश्चर्यकारक ठरला. त्यातच काही चाहत्यांनी 2011शी तुलना करताना यंदा विश्वचषक भारतच जिंकणार की 1992चा योगायोग पाहता पाकिस्तान जिंकणार असे भ्रम निर्माण होणारे भाकित केले. ते कसे होईल हे आपण जाणून घेऊ.

भारताचा योगायोग
ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी20 विश्वचषकात भारताने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत उत्तम सुरूवात केली. त्यानंतर भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना वगळता बाकी सर्व सामने जिंकले. 2011ची गोष्ट केली तर तेव्हाही भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हाही भारत बाकी सामने जिंकला होता आणि अंतिम सामन्यात श्रीलंकेला पराभूत करत विजेता ठरला होता. तसाचा काहीसा योगायोग आताच्या टी20 विश्वचषकात दिसत आहे. 2011मध्ये भारताने पाकिस्तान आणि नेदरलॅंड्सला हरवले, तर 2022मध्येही भारताने या दोन्ही संघांचा पराभव केला आहे. त्याचबरोबर 2011च्या वनडे विश्वचषकात आयर्लंडने इंग्लंडला हरवले होते आणि 2022मध्येही त्याचीच पुनरावृत्ती झाली. यामुळे भारत जिंकणार अशी भविष्यवाणी केली जात आहे.

पाकिस्तानचा योगायोग
पाकिस्तानने वनडे विश्वचषक 19992मध्ये आणि टी20 विश्वचषक 2009मध्ये जिंकला. 1992च्या वनडे विश्वचषकात तेव्हाही पाकिस्तान सर्वात कमी अशा 9 अंकाने उपांत्य फेरीत पोहोचला होता, आताची गुणतालिका पाहिली तर उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या चार संघांपैकी पाकिस्तानचे 6 गुण सर्वात कमी आहेत. त्याचबरोबर तेव्हाच्या वनडे विश्वचषकाचा आयोजक ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीतही पोहोचला नव्हता.

वनडे विश्वचषकादरम्यान इम्नान खान याचा अल्फाबेटमध्ये 9 अक्षरे आहेत, तर बाबर आझम याच्या अल्फाबेटमध्येही 9 अक्षरे आहेत. त्याचबरोबर 1992मध्ये पाकिस्तानचा उपांत्य फेरीचा सामना न्यूझीलंडशीच झाला होता. तर अंतिम सामन्यात इंग्लंडचा पराभव केला होता, मात्र इथे भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना होणे बाकी आहे.

या दोन्हीवरून कोणत्या संघाचा योगायोग खरा ठरतो हे लवकरच कळेल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात विराटने छाती, तर चाहत्यांनी धरले डोके; काळजी करण्याचे कारण…
शोएब अख्तरने घेतली दक्षिण आफ्रिका संघाची फिरकी; म्हणाला, तुम्ही सर्वात मोठे ‘सी’ आहात


Next Post
Shakib Al Hasan

शाकिब अल हसनचे मोठे विधान, उपांत्य फेरीतून बाहेर पडल्यानंतरही संघावर खुश

Photo Courtesy: Twitter

कतारचा फिफा वर्ल्डकप की मृत्यूची खाण! बुंदेसलिगाच्या सामन्यात झळकले "बॉयकॉट कतार 2022" चे बॅनर्स

Danushka Gunathilaka

मोठी बातमी! रे*प केसचा आरोपी धनुष्का गुणतिलकाची श्रीलंका संघातून हकालपट्टी, जामीनही नाही मिळाला

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143