---Advertisement---

‘भारत जुन्या पद्धतीचे क्रिकेट खेळतो’; दिग्गजाची टीम इंडियाच्या जिव्हारी लागणारी टीका

On: रविवार, नोव्हेंबर 27, 2022 12:03 AM
Team-India
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर टी20 मालिकेत विजय मिळवल्यानंतर आता वनडे मालिकेत भारतीय संघ पिछाडीवर आहे. भारताला पहिल्या सामन्यात यजमान न्यूझीलंडने पराभूत केले. भारतीय संघाच्या या पराभवानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार व समालोचक मायकल वॉन याने भारतीय संघाच्या वन-डे क्रिकेट खेळण्याच्या पद्धतीवरच टीका केली आहे.

टी20 मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाने ऑकलंड येथे पहिला वनडे सामना खेळला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी शानदार खेळ करत यजमान संघासमोर ‌‌‌307 धावांचे आव्हान उभे केले. भारतीय गोलंदाजांना मात्र या आव्हानाचा बचाव करता आला नाही. केन विलियम्सनच्या नाबाद 94 व टॉम लॅथम याच्या नाबाद 145 धावांच्या जोरावर न्यूझीलंडने भारताला 7 गडी राखून पराभूत केले.

 

भारतीय संघाच्या या खराब कामगिरीनंतर इंग्लंडचा माजी कर्णधार व समालोचक मायकल वॉननने भारतीय संघाच्या खेळण्यावर टीका केली. भारताचा माजी सलामीवीर ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌वसिम जाफर याने न्यूझीलंडच्या विजयानंतर न्यूझीलंड संघाचे अभिनंदन करणारे ट्विट केले. त्याने लॅथम व विलियम्सनचे विशेष कौतुक केले. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी हा सामना 306 ऐवजी 270 भावांचा बनवला असे त्याने म्हटले.

जाफरच्या या ट्विटला उत्तर देत वॉन म्हणाला,

‘भारतीय संघ जुन्या पद्धतीचे वनडे क्रिकेट खेळतो. सात नव्हे तर कमीत कमी सहा गोलंदाज तरी तुम्ही खेळवायला हवेत’

वॉन हा सातत्याने भारतीय संघावर टीका करत असतो. त्याचे व जाफरचे ट्विटरवर सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. भारतीय संघाला आता या मालिकेत विजय मिळवण्यासाठी दोन्ही सामने जिंकावे लागते. मालिकेतील दुसरा सामना रविवारी खेळला जाईल.

(India Playing Out Dated ODI Cricket Michael Vaughan Said)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जगभरातील गोलंदाजांमध्ये सूर्याने घेतले ‘या’ पाकिस्तानी दिग्गजाचे नाव, वाचा कोण आहे तो खेळाडू
‘हा’ खेळाडू भारताचा आक्रमक कर्णधार होऊ शकतो, गौतम गंभीर याने केली भविष्यवाणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---