विराट कोहली (virat kohli) याच्या नेतृत्वातील भारताचा कसोटी संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर (south africa tour of india) आहे. भारत आणि दक्षिण अफ्रिका संघात खेळली जाणारी कसोटी मालिका २६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. अशात हे पाहण्यासारखे असेल की, पहिल्या कसोटी संमन्यात विराट कोणत्या खेळाडूंसह मैदानावर उतरतो.
भारतीय संघ मागच्या तीन दिवसांपासून दक्षिण अफ्रिकेतील सेंचुरीयनमधील सुपरस्पोर्ट्स पार्कमध्ये सराव करत आहे. दक्षिण अफ्रिका क्रिकेट बोर्डने (csa) भारतीय संघाला मुख्य स्टेडियमवर सराव करण्याची संधी दिली आहे, जी चांगली गोष्ट असल्याचे सांगितले जात आहे. भारताचा कसोटी कर्णधार विराट त्याच्या आक्रमकतेसाठी ओळखला जातो. विराटला कसोटी सामन्यात पाच गोलंदाजांसह उतरायला आवडते. अष्टपैलू रवींद्र जडेजा सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी एक चांगला पर्याय असतो, पण त्याच्या अनुपस्थितीत शार्दुल ठाकून ही जबाबदारी पार पाडू शकतो.
इशांतची जागा सिराज घेणार
भारताच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी आगामी दौऱ्याबाबत बोलताना सांगितले की, “मला वाटते की संघ जर पाच गोलंदाजांसह उतरला, तर शार्दुल ठाकूर चांगला पर्याय आहे. कारण, तो सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी एक पर्याय असेल आणि आपल्याकडे रविचंद्रन अश्विनदेखील आहे. संघात चार गोलंदाजांचे स्थान जवळपास पक्के आहे. यामध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अश्विन आणि मोहम्मद सिराज यांचे नाव येते. सध्याचा फॉर्म पाहता मला नाही वाटत की इशांतला सिराजच्या जागी संधी मिळेल.”
रहाणे विहारीला मागे टाकणार
पहिला सामना सेंचुरियनमध्ये खेळला जाणार आहे, ही एक असी जागा आहे, जी समुद्रसपाटीपासून १३०० मीटर उंचीवर आहे. याठिकाणी गोलंदाज लवकर थकण्याची शक्यता आहे. अशात चार गोलंदाजांसह संघ या सामन्यात खेळला, तर ते लवकर थकतील. जर एक अतिरिक्त फलंदाजाचा संघात समावेश करायचा असेल, तर अजिंक्य राहाणेच्या नावावर सर्वप्रथम विचार केला जाईल. हनुमा विहारी याबाबतीत मागे राहील.
न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत विहारीने महत्वाची भूमिका पार पाडली होती. तर तो भारत अ दक्षिण अफ्रिका दौऱ्यात देखील सहभागी होती. भारत अ संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने या दक्षिण अफ्रिका दौऱ्यात तीन अर्धशतके केली, यामध्ये त्याने अनुक्रमे ५४, ७२ आणि ६३ अशी खेळी केली. तर दुसरीकडे रहाणे मागच्या मोठ्या काळापासून खराब फॉर्ममध्ये आहे, परंतु तरीही त्याला अजून एक संधी मिळण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानी दिग्गजाने निवडली ‘टी२० टीम ऑफ द इयर’; चौघा भारतीयांचा समावेश
वनडेत पाँटिंग, टी२०त धोनी अन् कसोटीत स्मिथ, क्रिकेटमधील ‘बड्या’ विक्रमात हे दिग्गज राहिलेत ‘नंबर १’