विश्वचषक 2023 स्पर्धेत रविवारी (29 ऑक्टोबर) भारत आणि इंग्लंड हे संघ समोरासमोर आले. लखनऊ येथील इकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. विजयासाठी आसुसलेल्या इंग्लंड संघाने हा निर्णय योग्य ठरवत नियंत्रित गोलंदाजी केली. भारतीय संघासाठी कर्णधार रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांनी संघर्ष करत संघाला 229 पर्यंत पोहोचवले.
सलग पाच सामने जिंकून या सामन्यात उतरलेल्या भारतीय संघासाठी सुरुवात चांगली झाली नाही. शुबमन गिल 9 आणि विराट कोहली शून्यावर बाद झाल्यामुळे भारतीय संघ संकटात सापडला होता. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला श्रेयस अय्यर 16 चेंडूंचा सामना केल्यानंतर तो केवळ चार धावा काढून बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा व केएल यांनी अर्धशतकी भागीदारी करत डाव सावरला . राहुलने 39 धावांचे योगदान दिले.
कर्णधार रोहित शर्मा याने त्यानंतरही आपला खेळ सुरू ठेवला. मात्र वैयक्तिक 87 धावांवर तो झेलबाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादवने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत भारताला सामन्यात पुढे नेले. तो अर्धशतक झळकावण्यापासून एक धाव दूर व्हायला व 49 धावांवर बाद झाला. अखेर कुलदीप यादव व जसप्रीत बुमराह यांनी काहीशा धावा जोडत भारताला 229 पर्यंत पोहोचवले. इंग्लंडसाठी डेव्हिड विली याने सर्वाधिक तीन बळी मिळवले.
(India Post 229 Against England In ODI World Cup Rohit Sharma Suryakumar Yadav Shines)
हेही वाचा-
झहीर टॉपला असलेल्या यादीत विराट पाचव्या क्रमांकावर, नकोशा विक्रमात सचिनला टाकले मागे
विश्वचषक 2023मध्ये भारत पहिल्यांदाच करणार ‘हे’ काम, इंग्लंडने जिंकला टॉस; Playing XIमध्ये नाही कोणताच बदल