वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील अखेरचा साखळी सामना रविवारी (12 नोव्हेंबर) खेळला गेला. भारत आणि नेदरलँड्स यांच्या दरम्यानच्या या सामन्यात भारतीय फलंदाजांनी वादळी फटकेबाजी केली. भारतीय संघासाठी श्रेयस अय्यर व केएल राहुल यांनी शतके झळकावली. रोहित शर्मा, शुबमन गिल व विराट कोहली यांनी देखील अर्धशतके ठोकली. यासह भारताने 410 धावा उभ्या केल्या. ही विश्वचषक इतिहासातील भारताची ही दुसरी सर्वात मोठी धावसंख्या ठरली.
Innings Break!
A batting display full of fireworks as centuries from Shreyas Iyer & KL Rahul light up Chinnaswamy 💥#TeamIndia post 410/4 in the first innings 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/efDilI0KZP#CWC23 | #MenInBlue | #INDvNED pic.twitter.com/eYeIDYrJum
— BCCI (@BCCI) November 12, 2023
रोहित शर्मा याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर त्याने व शुबमन गिल यांनी संघाला 11.5 षटकात 100 धावांची तुफानी सुरुवात दिली. दोघांनी अनुक्रमे 61 व 51 धावा बनवल्या. त्यानंतर आलेल्या विराट कोहली यांनी देखील अर्धशतक पूर्ण केले. नेदरलँड्स संघासाठी हा अखेरचा आनंदाचा क्षण ठरला.
चौथ्या क्रमांकावरील श्रेयस अय्यर व पाचव्या क्रमांकावरील केएल राहुल यांनी नेदरलँड्सच्या गोलंदाजांवर हल्ला चढवण्यास सुरुवात केली. अय्यरने यादरम्यान विश्वचषकातील आपले चौथे अर्धशतक पूर्ण केले. त्याने धावांचा वेग तसाच ठेवत केवळ 82 चेंडूंमध्ये आपल्या पहिल्या विश्वचषक शतकाला गवसणी घातली. दुसऱ्या बाजूने राहुल याने देखील अखेरच्या पाच षटकांमध्ये तुफानी फटकेबाजी करताना केवळ 61 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. तो शेवटच्या षटकात बाद झाला. तर अय्यरने अखेरपर्यंत नाबाद राहत 94 चेंडूंमध्ये 10 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने 128 धावा केल्या. नेदरलँड्ससाठी बास डी लिडे याने दोन बळी मिळवले
(India Post 410 Against Netherlands In ODI World Cup KL Rahul Shreyas Iyer Hits Century)
हेही वाचा-
बिग ब्रेकिंग! ‘हिटमॅन’ने बंगळुरूत घडवला इतिहास, सलामीवीर म्हणून चोपल्या ‘एवढ्या’ इंटरनॅशनल धावा
CWC 23: बंगळुरूत रोहित ‘टॉस का बॉस’, अखेरच्या सामन्यात दोन्ही संघात कुठलाच नाही बदल