---Advertisement---

ऑफ टू SA..! वनडे मालिकेसाठी धवनसह ‘हे’ भारतीय शिलेदार दक्षिण आफ्रिकेला रवाना, बघा फोटो

Indian-Players-Off-To-SA
---Advertisement---

भारत आणि दक्षिण अफ्रिका (sa vs ind odi series) यांच्यातील एकदिवसीय मालिका १९ जानेवारीपासून सुरू होणार आहे. एकदिवसीय मालिकेत सहभागी होण्यासाठी शिखर धवन, सूर्यकुमार यादव आणि इतर सात खेळाडू दक्षिण अफ्रिकेसाठी रवाना झाले आहेत. संघासोबत सामील होण्यापूर्वी खेळाडू तीन दिवसांच्या विलगीकरणात राहतील. पंरतु यादरम्यान भारतीय संघाला एक मोठा झटका बसला आहे. संघाचा अष्टपैलू वाशिंगटन सुंदर मंगळवारी (११ जानेवारी) कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे तो या दौऱ्यात सहभागी होऊ शकला नाही.

एकदिवसीय मालिकेसाठी रवाना झालेल्यांमध्ये भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, शिखर धवन, सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड, दीपक चाहर, वेंकटेश अय्यर, ईशान किशन, आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा सहभाग आहे. भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात सध्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. तिसरा कसोटी सामना संपल्यानंतर हे खेळाडू संघासोबत सामील होतील, तत्पूर्वी त्यांना तीन दिवसांच्या विलगीकरणातून जावे लागणार आहे.

https://www.instagram.com/p/CYmv7YtBUvj/?utm_source=ig_web_button_share_sheet

अष्टपैलू वॉशिंगटन सुंदरची एकदिवसीय मालिकेसाठी निवड केली गेली होती, पण तो या मालिकेला मुकला आहे. मागच्या जवळपास १० महिन्यांपासून सुंदर दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. भारतीय संघासोबत त्याने शेवटचा सामना मार्च २०२१ मध्ये खेळला होता. त्याने मागच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये तामिळनाडू संघासाठी चांगले प्रदर्शन करून दाखवले होते. तो या स्पर्धेत तामिळनाडूला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवणारा आणि महत्वाच्या विकेट्स घेणारा खेळाडू ठरला होता. अशात भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी त्याला अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

दक्षिण अफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी निवडेला भारताचा १८ सदस्यीय संघ –
केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, रिषभ पंत, ईशान किशन, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, वाशिंगटन सुंदर, जयंत यादव, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, प्रसिद्ध कृष्ण, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज.

महत्वाच्या बातम्या –

विराटला नाबाद घोषित केल्यानंतर भारत-दक्षिण आफ्रिकेचे कर्णधार आले आमने सामने, पाहा व्हिडिओ

भारीच ना!! टप्पा पडताच बुमराहच्या चेंडूने बदलला काटा; काही कळायच्या आत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बाद

वन मॅन आर्मी! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकाकी झुंज देणाऱ्या कोहलीचे होतंय भरभरून कौतुक, पाहा खास ट्वीट्स

व्हिडिओ पाहा –

वादापासून आयुष्यभर चार हात लांब राहिलेला Rahul Dravid जेव्हा क्रिकेटप्रेमींच्या डोक्यात गेला होता

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---