भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघांदरम्यान तॉमनवेल्थ गेम्स २०२२मधील पहिला उपांत्य सामना सध्या सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथण फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी भारतासाठी प्रथण फलंदाजी करताना सलामीवीर स्म्रीती मंधाना हिने दमदार अर्धशतक झळकावले. याशिवाय जेमिमाह रॉड्रिगेज हिने नाबाद ४४ धावांची खेळी करत भारताला पहिल्या डावाअखेरिस २० षटकात १६४ धावांपर्यंत पोहचवले.
Innings Break!
61(32) from @mandhana_smriti & 44*(31) from @JemiRodrigues guide #TeamIndia to a total of 164/5 on the board.
Over to our bowlers now 🫡
Scorecard – https://t.co/ex8lGZQVs1 #INDvENG #B2022 pic.twitter.com/PWqc3alOdn
— BCCI Women (@BCCIWomen) August 6, 2022
याशिवाय दिप्ती शर्माने २२, भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने २० धावा केल्या. तर, सलामीवीर फलंदाज शेफाली वर्मी हिने १५ धावांचे योगदान दिले. या तुफान फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने ५ विकेट गमावत १६४ धावा केल्या आहेत. त्यामुळे आता इंग्लंडला या सामन्यात विजय मिळवण्यासाठी २६५ धावांचा पाठलाग करावा लागेल. तर दुसरीकडे आता भारतीय गोलंदाजांवर हे लक्ष्य रोखण्याचे आवाहन आहे. यासाठी आता भारताची स्टार गोलंदाज रेणूका सिंग हिच्या कांद्यावर विशे, जबाबदारी असणार आहे.
सध्या सुरू असलेला भारत आणि इंग्लंडविरुद्धचा सामना बाद फेरीतील सामन्याप्रमाणे आहे. जो सामना जिंकेल तो संघ थेट अंतिम सामन्यात प्रवेश करेल. व ज्या संघला या सामन्यात पराभव प्राप्त होईल त्या संघाचे पहिल्या वहिल्या कॉमनवेल्थ क्रिकेट स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्याच्या स्वप्नावर वाणी फेरावे लागेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानी पैलवानाला आसमान दाखवणाऱ्या दीपक पुनियासाठी पंतप्रधानांचे खास ट्वीट
बीबीएल संपवण्यासाठी षडयंत्र? यूएई टी-२० लीग खेळण्यासाठी ऑसी प्लेयर्सला मिळणार कोट्यवधी
CWG 2022: इंडियाच्या झोळीत पडणार आणखी पदके, ऍक्शनमध्ये असतील ‘हे’ ६ भारतीय बॉक्सर्स