वनडे विश्वचषक 2023 मधील अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान खेळला जात आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत असलेल्या या अंतिम सामन्यात भारतीय संघाचे पहिल्या दहा षटकात आक्रमक फटकेबाजी करत 80 धावा वसूल केल्या. मात्र, यादरम्यान भारताने तीन महत्त्वपूर्ण बळी देखील गमावले.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलिया संघाने गोलंदाजी करण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेतला. रोहित शर्मा याने नेहमीच्या थाटात वेगवान सुरुवात दिली. मात्र, शूबमन गिल केवळ चार धावा काढून तंबूत परतला. त्यानंतरही रोहितची बॅट थांबली नाही व त्याने फटकेबाजी सुरू ठेवली. त्याला विराट कोहली याने देखील तशीच साथ दिली. मात्र, दहाव्या षटकात रोहित 31 चेंडू 47 धावा करून माघारी परतला. तर पुढच्या षटकात श्रेयस हा देखील फक्त चार धावा काढून बाद झाला.
https://www.instagram.com/reel/Cz0ogs_vWMv/?igshid=MzRlODBiNWFlZA==
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
ऑस्ट्रेलिया – ट्रेविस हेड, डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्युशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, ऍडम झाम्पा, जोश हेझलवूड (World Cup 2023 IND vs AUS final Toss See playing XI Here)
(India Scored 80 Runs In First 10 Overs Lost Rohit Sharma Gill And Iyer In ODi World Cup Final)
महत्वाच्या बातम्या –
World Cup 2023 Final: अर्धशतक हुकलं, पण इतिहास घडवला! वनडेत रोहितने केली ‘हा’ जबरदस्त विक्रम करण्याची डेरिंग
CWC2023 Final: 2003चा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया सज्ज, ऑस्ट्रेलियाने Toss जिंकून घेतली बॉलिंग; Playing XI