ओडिशा येथे सुरू असलेला हॉकी विश्वचषक आता अंतिम टप्प्यात आला आहे. रविवारी स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाईल. तत्पूर्वी, इतर संघांनी आपापले स्पर्धेतील स्थान निश्चित करण्यासाठी क्रॉस ओव्हर सामने खेळले. उपांत्यपूर्व फेरीत जागा मिळवण्यात अपयशी ठरलेल्या यजमान भारतीय संघाने 9 व्या व 10 व्या स्थानासाठी खेळल्या गेलेल्या सामन्यात विजय मिळवत विश्वचषकात नववे स्थान पटकावले. भारताने या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 5-2 असा विजय मिळवला.
India's valiant efforts pay off as they secure a win over South Africa in the final showdown.
🇿🇦RSA 2-5 IND🇮🇳#HockeyIndia #HWC2023 #HockeyWorldCup2023 #StarsBecomeLegends #RSAvsIND @CMO_Odisha @sports_odisha @IndiaSports @Media_SAI @SA_Hockey pic.twitter.com/M63dTt9a65
— Hockey India (@TheHockeyIndia) January 28, 2023
भारतीय संघाला आपल्या गटात अव्वल स्थान मिळवण्यात अपयश आल्याने क्रॉस ओव्हर सामना खेळावा लागला होता. त्या सामन्यात न्यूझीलंडने भारताला पराभूत करत विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर केलेले. त्यानंतर शनिवारी भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी झाला. भारतासाठी अभिषेक याने मैदानी गोल करत खाते उघडले. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत सिंग याने गोल करत आघाडी दुप्पट केली. त्यांच्या व्यतिरिक्त समशेर, आकाशदीप व सुखजित यांनी देखील भारतासाठी गोल नोंदवले. दक्षिण आफ्रिकेकडून दोन गोल करण्यात आले.
यापूर्वी झालेल्या 2018 हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेला. तिथे पराभूत झाल्यानंतर भारताने सहाव्या क्रमांकावर स्पर्धा समाप्त केलेली. यंदा मात्र भारताला ते स्थानही राखण्यात अपयश आले. रविवारी (29 जानेवारी) गतविजेता बेल्जियम आणि जर्मनी हे विजेतेपदासाठी झुंज देतील. त्याआधी ऑस्ट्रेलिया व नेदरलँड्स यांच्या दरम्यान तिसऱ्या क्रमांकासाठीचा सामना होईल.
(India secure 9 th place in hockey World Cup after beating south Africa by 5-2)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वनडे क्रिकेट पाहून आता पंचही कंटाळले! दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड सामन्यातील व्हिडिओ व्हायरल
शॉन पॉलकसारखा अष्टपैलू बनू शकतो ‘हा’ खेळाडू, डिविलियर्सकडून दक्षिण आफ्रिकी युवकाचे कौतुक