---Advertisement---

BREAKING: न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेतूनही रोहित-विराटचा पत्ता कट! पृथ्वीला मिळाली संधी

On: शुक्रवार, जानेवारी 13, 2023 10:39 PM
Virat Kohli & Rohit Sharma
---Advertisement---

पुढील आठवड्यात सुरू होत असलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड या मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी भारतीय क्रिकेट संघाच्या नव्या निवड समितीने संघाची घोषणा केली. वनडे संघाचे नेतृत्व रोहित शर्मा हाच करेल. मात्र, टी20 संघातून रोहितसह विराट कोहली याला देखील वगळण्यात आले आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वातील या संघात पृथ्वी शॉ याचे पुनरागमन झाले.

https://twitter.com/BCCI/status/1613938839877476352?t=wUYmf9V4XOL7EYpzImot2g&s=19

न्यूझीलंड संघ या दौऱ्यावर प्रथम वनडे मालिका खेळेल. सध्या श्रीलंकेविरुद्ध खेळत असलेल्या संघात या मालिकेसाठी फारसे बदल झालेले नाहीत. अक्षर पटेल व केएल राहुल कौटुंबिक कारणाने या मालिकांसाठी उपलब्ध नसतील. त्यांच्या जागी अष्टपैलू शार्दुल ठाकूर व शाहबाज अहमद यांनी संघात पुनरागमन केले आहे. तर, यष्टीरक्षक केएस भरत प्रथमच वनडे संघाचा भाग बनेल.

टी20 संघातून रोहित शर्मा व विराट कोहली यांना वगळून निवड समितीने भविष्याचा विचार सुरू झाल्याचे संकेत दिले आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेतीलच खेळाडू या संघात दिसतील. जखमी संजू सॅमसन हा संघाचा भाग नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोर्‍याने धावा काढत असलेल्या मुंबईचा पृथ्वी शॉ याला जवळपास दीड वर्षांनी राष्ट्रीय संघात स्थान मिळाले.

वनडे मालिकेसाठी भारतीय संघ-

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज व उमरान मलिक.

टी20 मालिकेसाठी भारतीय संघ-

हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ व मुकेश कुमार.

(India Sqaud Announced For ODI And T20I Series Against Newzealand Rohit Virat Not In T20 Team)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

हॉकी विश्वचषकात स्पेनला पराभूत करत टीम इंडियाचा विजयी प्रारंभ 

महाराष्ट्र केसरी 2023: गादी विभागातून हर्षवर्धन सदगीर आणि शिवराज राक्षेची अंतिम फेरीत धडक 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---