भारतीय संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. कसोटी आणि वनडे मालिका खेळल्यानंतर भारताला वेस्ट इंडीजविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी बुधवारी (5 जुलै) संघाची घोषणा केली गेली. हार्दिक पंड्या या संघाचा कर्णधार आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गजांना विश्रांती दिली गेली आहे.
वेस्ट इंडीज दौऱ्यात भारतीय संघाला एकूण 10 सामने खेळायचे आहेत. यातील पाच सामने टी-20 मालिकेची असतील, जी 3 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वात भारताचा युवा संघ या मालिकेत खेळेल. संजू सॅमसन (Sanju Samson) यावा वेस्ट इंडीजविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर टी-20 मालिकेसाठीही निवडले गेले आहे. सूर्यकुमार यादव या मालिकेत उपकर्णधाराची जबाबदारी पार पाडताना दिसेल. तर मुकेश कुमार (Mukesh Kumar) याला भारतासाठी पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jayaswas) आणि तिलक वर्मा (Tilak Verma) यांना पहिल्यांदाच भारताच्या टी-20 संघात सामील केले गेले आहे.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ –
इशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, यशस्वी जैसवाल, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार.
तत्पूर्वी भारताला 12 जुलैपासून वेस्ट इंडीजविरुद्धची कसोटी मालिका खेळायचा आहे. दोन सामन्यांची ही मालिका संपल्यानंतर उभय संघात तीन सामन्यांची वनडे मालिकाही खेळली जाणार आहे. वनडे मालिकेची सुरुवात 27 जुलै रोजी होईल.
वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ
रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.
वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारताचा वनडे संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.(India squad announced for T20 series against West Indies)
बातमी अपडेट होत आहे…
महत्वाची बातमी –
खेळाडू वृत्तीचं सांगूच नका! बेअरस्टो वादावर पॅट कमिन्सची तिखट प्रतिक्रिया
भीषण अपघातानंतर प्रवीण कुमारणे सांगितलं जीव वाचण्याचं कारण! वाचा काय म्हणाला माजी वेगवान गोलंदाज