---Advertisement---

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संभाव्य संघ, अनेक खेळाडूंना दाखवला जाईल बाहेरचा रस्ता, खास गोलंदाजाचं पुनरागमन निश्चित!

On: मंगळवार, जुलै 9, 2024 5:20 PM
---Advertisement---

टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आता भारतीय संघासमोर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचं आव्हान आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये खेळली जाणार आहे. टीम इंडिया ही स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार की नाही? याचा निर्णय अद्याप झालेला नाही. जर भारतीय संघ पाकिस्तानात गेला नाही, तर टीम इंडियाचे सामने श्रीलंका किंवा युएईत खेळले जाऊ शकतात.

या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडियामध्ये कोण-कोणत्या खेळाडूंना संधी मिळू शकते आणि कोणाला वगळलं जाऊ शकतं, हे सांगणार आहोत.

सलामीवीरांबद्दल बोलायचं झालं तर, रोहित शर्मासोबत शुबमन गिलला संधी मिळू शकते. या दोघांची सलामी जोडी 2023 विश्वचषकातही दिसली होती. बॅकअप ओपनर म्हणून ऋतुराज गायकवाडची निवड होऊ शकते. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळू शकतो. तर मधल्या फळीत रिषभ पंत, केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांची निवड केली जाऊ शकते. पंत 2023 विश्वचषकाचा भाग नव्हता पण त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात नक्कीच स्थान मिळू शकते. डावखुरा असल्यानं त्याच्यामुळे संघात विविधता येते.

स्टार फलंदाज केएल राहुलची 2024 टी20 विश्वचषकात निवड झाली नव्हती. पण त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निश्चितपणे संघात स्थान दिलं जाऊ शकते. त्याला एकदिवसीय संघातून दुर्लक्षित करता येणार नाही. तो मधल्या फळीत संघाला स्थिरता देतो. सूर्यकुमार यादवची निवडही जवळपास निश्चित मानली जात आहे.

अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पांड्याला संघात स्थान मिळू शकतं. तर कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांचा फिरकीपटू म्हणून समावेश केला जाऊ शकतो. जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांची वेगवान गोलंदाज म्हणून निवड होऊ शकते.

मोहम्मद शमी सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. मात्र तो चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत संघात पुनरागमन करू शकतो. यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, आवेश खान, मुकेश कुमार, शिवम दुबे आणि शार्दुल ठाकूर या खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारताचा संभाव्य संघ पुढीलप्रमाणे
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह

महत्त्वाच्या बातम्या – 

आयसीसी ‘प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्काराची घोषणा, भारताच्या ‘या’ खेळाडूनं मारली बाजी
विराट कोहलीचं स्वप्नातील घर पाहिलं का? उत्कृष्ट इंटीरियर, सुंदर लोकेशन; किती आहे किंमत?
पाऊस कितीही असो, मॅच कधीच थांबणार नाही! येथे बनत आहे जगातील पहिलं अत्याधुनिक क्रिकेट स्टेडियम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---