काही महिन्यातच टी20 विश्वचषकाचा डंका वाजणार आहे. परंतु, ही स्पर्धा सुरू होण्याअगोदर भारतीय संघाला एकच टी20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळण्याची संधी मिळणार आहे. ही संधी भारतीय संघाला अगामी श्रीलंका दौऱ्यात मिळेल. मर्यादीत षटकांच्या भारतीय संघाचा पुढील (जुलै) महिन्यात श्रीलंका दौरा असून संघाला 3 टी20 सामन्याव्यतिरिक्त तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत.
श्रीलंका दौर्यावर भारतीय संघाचे नेतृत्व विराट कोहली आणि रोहित शर्माच्या अनुपस्थितीत शिखर धवन करणार आहे. तर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड देखील संघासोबत श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे या लेखातून आपण भारत-श्रीलंका यांच्यातील थोडी टी20 आकडेवारी जाणून घेऊ.
भारतीय संघाचे श्रीलंकेत वर्चस्व
भारतीय संघाची श्रीलंकेमधील टी20 सामन्यांमधील आकडेवारी यजमान श्रीलंका संघापेक्षाही चांगली आहे. भारतीय संघाने श्रीलंकामध्ये आतापर्यंत 13 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्यामध्ये भारतीय संघाने 11 सामन्यांमध्ये विजय मिळवला तर 2 सामन्यांमध्ये भारतीय संघाचा पराभव झाला आहे.
तसेच श्रीलंका संघाने आपल्या घरच्या मैदानांवर 42 टी20 सामने खेळले असून फक्त 15 सामन्यांमध्ये विजय मिळवला. तर 25 सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामध्ये भारतीय संघाची विजयाची टक्केवारी सरासरी 85 आहे. श्रीलंका संघाने फक्त 36% सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. हा भारतीय संघाचा विक्रम पाहता टी20 क्रिकेटच्या बाबतील त्यांना श्रीलंका दौरा फारसा कठीण जात नसल्याचे सिद्ध होत आहे.
टी20 मध्ये भारतच श्रीलंकेला वरचढ
श्रीलंका संघाविरुद्ध सर्वच संघाची आकडेवारी पाहता भारतीय संघ प्रथम स्थानावर आहे. भारतीय संघाने श्रीलंका संघासोबत आतापर्यंत 19 टी20 सामने खेळले आहेत. त्यामध्ये 13 सामन्यांत विजय मिळाला तर 5 सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. तर एक सामन्याचा निकाल लागलेला नाही.
श्रीलंकेविरुद्ध टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय भारताने मिळवले असून त्याच्यापाठोपाठ या यादीत पाकिस्तानचा क्रमांक येतो. पाकिस्तान संघाने श्रीलंका संघासोबत 21 सामन्यांपैकी 13 सामन्यांमध्येच विजय मिळवला, तर 8 सामन्यांमध्ये संघाला हार पत्करली. न्यूझीलंड संघाने श्रीलंका विरुद्ध 19 सामन्यांपैकी 10 सामन्यांमध्ये विजयाची नोंद केली.
मायदेशातील शेवटच्या पाच मालिकेमध्ये श्रीलंकाचा पराभव
श्रीलंका संघाला मायदेशात शेवटच्या 5 टी20 मालिका गमवाव्या लागल्या आहेत. या 5 मालिकांपैकी श्रीलंका संघाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3 सामन्यांच्या मालिकेमध्ये 0-3 ने पराभव पत्करावा लागला. यानंतर भारतीय संघाकडून 0-2 ने पराभून व्हावे लागले आहे. तर वेस्टइंडीज संघाकडून देखील 1-2 आणि इंग्लंड संघाकडून 0-3 अशा फरकाने श्रीलंका संघ पराभूत झाला. तसेच पाकिस्तानने 2-0 असे पराभूत केले आहे.
श्रीलंका दौऱ्यावरील भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नीतीश राणा, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, राहुल चाहर, के गौतम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), दीपक चाहर, नवदीप सैनी, चेतन सकारिया.
भारतीय संघाचे श्रीलंका दौऱ्यावरील सामन्याचे वेळापत्रक
एकदिवसीय मालिका
पहिला एकदिवसीय सामना – 13 जुलै – कोलंबो – दुपारी 2:30 वाजता (भारतीय वेळेनुसार)
दुसरा एकदिवसीय सामना – 16 जुलै – कोलंबो – दुपारी 2:30 वाजता (भारतीय वेळेनुसार)
तिसरा एकदिवसीय सामना -18 जुलै – कोलंबो – दुपारी 2:30 वाजता (भारतीय वेळेनुसार)
टी20 मालिका
पहिला टी20 सामना – 21 जुलै – कोलंबो -संध्याकाळी 7 वाजता (भारतीय वेळेनुसार)
दुसरा टी20 सामना – 23 जुलै – कोलंबो – संध्याकाळी 7 वाजता (भारतीय वेळेनुसार)
तिसरा टी20 सामना – 25 जुलै – कोलंबो संध्याकाळी 7 वाजता (भारतीय वेळेनुसार)
महत्त्वाच्या बातम्या –
“श्रीलंका दौऱ्यावर सर्व खेळाडूंना संधी देणे शक्य नाही”, द्रविडचे मोठे भाष्य
ब्रेथवेटच्या ४ षटकारांची स्टोक्सने केली सव्याज परतफेड, व्हिडिओ होतोय व्हायरल