---Advertisement---

तिसऱ्या दिवशी भारताची जबरदस्त सुरूवात, सिराज-अश्विनने दिले यजमानांना पाठोपाठ धक्के

On: शनिवार, डिसेंबर 24, 2022 9:51 AM
KL Rahul, Gill & R Ashwin
---Advertisement---

बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. गुरूवारपासून (22 डिसेंबर) सुरू झालेल्या या सामन्याचा आज (24 डिसेंबर) तिसरा दिवस आहे. यावेळी तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच मोहम्मद सिराज आणि आर अश्विन यांनी बांगलादेशला लागोपाठ दोन धक्के दिले आहेत. ढाकामध्ये सुरू असलेल्या या सामन्याचे पारडे कधी बांगलादेश तर कधी भारताकडे झुकताना दिसत आहे. भारताने पहिल्या डावात 314 धावसंख्या उभारत 87 धावांची आघाडी घेतली होती.

तिसऱ्या दिवशीच्या सुरूवातीलच अश्विनने सलामीवीर नजमुल शांतो याला बाद केले. 5 धावांवर शांतो पायचीत झाला. अश्विनची ही कसोटी कारकिर्दीतील 448वी विकेट ठरली आहे. त्यानंतर 5 षटकांच्या अंतरानेच सिराजने मोमीनुल हक याला रिषभ पंतकरवी (Rishabh Pant) झेलबाद केले. यामुळे बांगलादेशची स्थिती 12.5 षटकात 26 धावा 2 विकेट्स अशी झाली. India started strongly on day three, Mohammed Siraj & R Ashwin gave the hosts back-to-back shocks BANvIND 2nd Test

मोमीनुलची विकेट भारतासाठी महत्वाची ठरली, कारण त्याने बांगलादेशच्या पहिल्या डावात 84 धावा केल्या होत्या. ज्यामुळे यजमानांनी पहिल्या डावात 227 धावसंख्या उभारली. त्या डावात भारताकडून उमेश यादव आणि अश्विन यांनी प्रत्येकी 4-4 विकेट्स घेतल्या होत्या.

https://twitter.com/BCCI/status/1606500377322364928?s=20&t=DuzOMuIXmEq_w2TAQPPkqw

प्रत्युत्तरात भारताने पंतच्या 93 धावा आणि श्रेयस अय्यरच्या 87 धावांच्या जोरावर 300चा आकडा पार केला. या दोघांव्यतिरिक्त भारताचा एकही फलंदाज पहिल्या डावात 30च्या पुढे गेला नाही. या सामन्यात भारत पुन्हा एकदा केएल राहुल याच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली होती. तेव्हा दोन्ही संघाच्या अंतिम अकरामध्ये बदल दिसला. भारताने मागील सामन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या कुलदीप यादव याला बाकावर बसवले, तर त्याच्याजागी जयदेव उनाडकट याला संधी दिली.

भारताने या मालिकेतील पहिला सामना जिंकत दोन सामन्याच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नॉर्थ ईस्ट युनायटेड दुसऱ्या हाफमध्ये मुसंडी मारण्यास सज्ज, एटीके मोहन बागानशी सामना
जेव्हा सगळ्या टीम इंडियाला सोडलं, पण हरभजन सिंगला मात्र न्यूझीलंडच्या विमानतळावर पकडलं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---