भारताची एशिया कपची मोहीम आजपासून हॉंगकॉंग विरुद्धच्या सामन्याने सुरु होणार आहे. भारतीय संघ वनडेमध्ये चागंल्या लयीत आहे. भारत तिन्ही क्षेत्रात (गोलंदाजी, फलंदाजी, आणि क्षेत्ररक्षण) उत्तम आहे. पण निवड समिती आणि चाहते यांना सर्वात मोठा भेडसावणारा पप्रश्न आहे तो म्हणजे भारताच्या फलंदाजीच्या मधल्या फळीतला.
विश्वचषक स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून एशिया कपमध्ये खेळाडूंची चाचपणी होणार आहे. मध्यक्रमात फलंदाजी कोण करणार हा भारतीय संघा समोरील मोठा प्रश्न आहे. त्यातच भर म्हणजे भारतीय संघ एशिया कप स्पर्धेत विराट कोहली शिवाय खेळणार आहे. मध्यक्रमातील फलंदाजाची मागील एका वर्षात कामगिरी फारशी चांगली झालेली नाही.
केएल राहुल 6 सामने 37 धावा, सरासरी 9 .25. मनीष पांडे 10 सामने 171 धावा, सरासरी 34.20. केदार जाधव 17 सामने 243 धावा, सरासरी 22.09. दुखापतीमुळे जाधवला इंग्लड दौरा मुकावा लागला होता. दिनेश कार्तिक नऊ सामने 204 धावा सरासरी 51.00. दिनेश कार्तिकची ही कामगिरी चांगली दिसत असली तरी इंग्लंडच्या वेगवान खेळपट्टीवर त्याला संघर्ष करावा लागला होता.
दोन वर्षानंतर वनडेत पुनरागमन करत असलेला अंबाती रायडू हा देखील मधल्या फळीतील महत्वाचा फलंदाज आहे. मधल्या फळीचा मुख्य आधार असलेल्या धोनीकडून अपेक्षा असल्या तरी तो फलंदाजी बरोबर गोलंदाजांना मार्गदर्शन करत यष्टीरक्षकाची भूमिका लिलया पार पाडत असतो.
मधल्या फळीतील अजून तिघांचा विचार करता अजिंक्य रहाणे हा काही वेळा सलामीला खेळायला येतो. सुरेश रैना आणि श्रेयश अय्यर यांचा एशिया कपच्या संघात समावेश नाही.
मधल्या फळीतील फलंदाजांना जास्त संधी मिळत नसल्याचे आपल्याला दिसत आहे. सौरव गांगुली कर्णधार असताना प्रत्येक खेळाडूला 6 ते 7 सामन्यात संधी मिळायची. धोनी कारकिर्दीत देखील हाच प्रयोग चालू होता. आता मात्र तेवढी संधी खेळाडूंना मिळत नाही. क्रमांक 4 ते 6 ह्या जागांवरची फलंदाजी एशिया कप स्पर्धेत आणि 9 महिन्यांनी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी महत्वाची ठरणार आहे.
राहुल हा क्रमांक 4 फलंदाजी करतो विराट कोहलीच्या अनुपस्थितीत नंबर 3 वर कशी फलंदाजी करेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
शिखर धवनची इंग्लड दौऱ्यातील कसोटी मालिकेतील कामगिरी अतिशय निराशाजनक झाली होती. मात्र तो अशियातील खेळपट्टयांवर चागंली कामगिरी करू शकतो.
संघ व्यवस्थापन मधल्या फळीसाठी पांडे, जाधव, कार्तिक, आणि रायडू यांच्यापैकी निवड करु शकतो. जाधवची फिरकी गोलंदाजी संघासाठी जेमेची बाजू ठरू शकते.
भुवनेश्वरचे पुनरागमन भारतासाठी जमेची बाजू ठरणार आहे. जसप्रित बुमराह हा फॉर्मात असून नव्याने संघात घेतलेला राजस्थानचा खलील अहमद ह्या तरुण वेगवान गोलंदाजावर विश्वास वाटत असल्याचे हंगामी कर्णधार रोहीत शर्माने सांगितले.
भारताचा पहिला सामना आज हाँगकाँग विरूध्द होणार असून 19 तारखेला भारत, पाकिस्तान विरूध्द खेळणार आहे. भारताची एशिया कप स्पर्धेला पाकिस्तान विरूद्धच्या सामन्याने खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. एशिया कप स्पर्धेला भारत आपली मधल्या फळीची रचना करण्याची संधी म्हणून पाहत आहे.
यातून निवडला जाईल 11 जणांचा संघ:
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन(उपकर्णधार), केएल राहुल, अंबाती रायडू, मनीष पांडे, केदार जाधव, एमएस धोनी (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, खलील अहमद आणि अक्षर पटेल.
महत्त्वाच्या बातम्या:
–एशिया कप २०१८: भारत विरुद्ध हाँग काँग सामन्याबद्दल सर्वकाही
–रोहित शर्मा एशिया कपमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करण्यास उत्सुक
–एशिया कप २०१८: स्पर्धेबाहेर होणारा श्रीलंका ठरला पहिला संघ; अफगाणिस्तानने दिला पराभवाचा धक्का