---Advertisement---

पाचव्या टी२०मध्ये भारताला मोठा धक्का, कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त

On: रविवार, फेब्रुवारी 2, 2020 3:21 PM
---Advertisement---

माऊंट मॉनगनुई। आज(2 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात पाचवा आणि शेवटचा टी20 सामना बे ओव्हल स्टेडियमवर सुरु आहे. हा सामाना सुरु असतानाच भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्मा फलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे आज तो क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानात उतरणार नाही.

आज भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीने विश्रांती घेतली असल्याने तो तिसऱ्या क्रमांकावर फलंजादाजीला आला होता. रोहितने 35 चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. पण 17 व्या षटकाचा पहिला चेंडू खेळल्यानंतर त्याच्या पोटरीचे स्नायू दुखावला.

यानंतर त्याने संघाच्या मेडीकल स्टाफची त्याने मदत घेतली. त्यानंतर रोहितने तीन चेंडूही खेळले, तसेच एक षटकारही मारला. परंतू त्याला वेदना होत असल्याने अखेर तो रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला. त्याने 41 चेंडूत 60 धावांची खेळी केली.

त्याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 बाद 163 धावा केल्या.

आता या सामन्यात रोहित ऐवजी केएल राहुल भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण करताना नेतृत्व करत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---