बर्मिंगहॅम। इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या 2019 विश्वचषकात भारतीय संघाला रविवारी इंग्लंड विरुद्ध एजबस्टर्न स्टेडियममध्ये खेळाताना 31 धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे. हा भारताचा या विश्वचषकातील पहिलाच पराभव आहे. भारतीय संघाला या पराभवा पाठोपाठ आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू विजय शंकर या विश्वचषकातून पायाच्या अंगठ्याला दुखापत झाल्याने बाहेर पडला आहे. त्यामुळे आता उर्वरित विश्वचषकासाठी भारतीय संघात त्याचा बदली खेळाडू म्हणून मयंक अगरवालला संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.
अगरवालने अजून भारताच्या वरिष्ठ संघाकडून एकही वनडे सामना खेळलेला नाही. पण त्याने मागील वर्षी ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताकडून कसोटी सामन्यातून पदार्पण केले होते.
याबद्दल बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारींनी पीटीआयला सांगितले की ‘विजयला पुन्हा एकदा जसप्रीत बुमराहचा चेंडू अंगठ्याला लागला आहे. त्याची परिस्थिती सध्या खूप चांगली नाही. त्यामुळे तो उर्वरित स्पर्धेत सहभागी होऊ शकत नाही. तो परत मायदेशी परतेल.’
तसेच सुत्रांनी माहिती दिली की ‘भारतीय संघ व्यवस्थापन मयंक अगरवालला शंकरचा बदली खेळाडू म्हणून संधी देण्याचा विचार करत आहे. तो सलामीवीर फलंदाज आहे. त्यामुळे जर रिषभ पंतने पुढील दोन सामन्यात खराब कामगिरी केली तर केएल राहुलला पुन्हा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करु शकतो.’
विजय शंकरने या विश्वचषकात तीन सामन्यात फलंदाजी करताना 58 धावा केल्या आहेत. तर एका सामन्यात गोलंदाजी करताना 2 विकेट्स घेतल्या आहेत.
भारताला याआधीच शिखर धवन बाहेर पडल्याने मोठा धक्का बसला होता. शिखरच्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्याने त्याला या विश्वचषकातून बाहेर जावे लागले होते. त्याच्या ऐवजी रिषभ पंतला संधी देण्यात आली होती.
या विश्वचषकात भारताचा पुढील सामना 2 जूलैला बांगलादेश विरुद्ध एजबस्टर्न स्टेडीयमवर होणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–रिषभ पंतबद्दलच्या प्रश्नावर रोहित शर्माने दिले असे मजेशीर उत्तर, पहा व्हिडिओ
–इंग्लंड विरुद्ध शतक करत रोहित शर्माने केली गांगुलीच्या ‘दादा’ विक्रमाची बरोबरी






