महाराष्ट्रात सध्या सर्वत्र लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू आहे. मुंबईमध्ये तर गणपती पूजेला विशेष महत्त्व आहे. मुंबईत एखाद्या मोठ्या लग्नाप्रमाणे गणपती महोत्सवाची तयारी केली जाते. मुंबईत 5 सप्टेंबरपासूनच गणपती महोत्सवाला सुरुवात झाली आहे. दरम्यान गणू बाप्पाच्या आगमनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधत आहे.
खरे तर, मुंबईचा राजा म्हणून क्रिकेटप्रेमींमध्ये प्रसिद्ध असलेल्या रोहित शर्माची क्रेझ मुंबईतील गणपती महोत्सवात पाहायला मिळाली. रोहित शर्माचे मुंबईत हजारो चाहते आहेत. रोहितच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने यावर्षी टी20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले होते, ज्याचा देशभरात मोठ्या प्रमाणात आनंद साजरा करण्यात आला होता. या विजय यात्रेची पुनरावृत्ती मुंबईकरांनी केली आहे.
टी20 विश्वचषक विजय परेडच्या धर्तीवर बाप्पाची गाडी सजवली
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रोहितचा हाती टी20 विश्वचषक घेतलेला एक कटआउट गणपतीच्या मूर्तीसोबत बनवला आहे. हा कटआउट पाहून जणू रोहित त्याची ट्रॉफी गणपतीला देत आहे, असे भासते. ज्या बसमध्ये गणपतीला ठेवण्यात आले आहे, ती बस तशीच सजवण्यात आली आहे, जशी भारतीय संघाच्या मुंबईतील विजय परेडसाठी सजवण्यात आली होती. या व्हिडिओ भारतीय संघाच्या टी20 विश्वचषक विजयाच्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. क्रिकेटप्रेमी मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ शेअर करत आहेत.
The iconic Ganpati Bappa welcome🫡”Ganpati Bappa giving world cup trophy to Captain Rohit Sharma”🥹🇮🇳
Thank you Captain for giving this much happiness to everyone @ImRo45 🐐🇮🇳👏 pic.twitter.com/21zqvuQ89y
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) September 5, 2024
दरम्यान भारताने 29 जून रोजी टी20 विश्वचषक 2024 सामना जिंकला होता. टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात बार्बाडोस येथे खेळला गेला होता. हा सामना खूपच रोचक होता. शेवटच्या क्षणी सूर्यकुमार यादवच्या एका झेलने सामन्याचे चित्र पालटले होते. भारताने हा सामना सात धावांनी जिंकला होता. या ऐतिहासिक विजयाने भारताचा 17 वर्षांचा टी20 विश्वविजयाचा दुष्काळ संपवला.
हेही वाचा –
विजय थलपतीच्या ‘GOAT’ सिनेमांत धोनीची झलक, एका सीनसाठी थिएटरचे झाले स्टेडियम!
“भारतीय संघात सध्या दर्जेदार फिरकीपटू नाहीत”, वीरेंद्र सेहवागचे वादग्रस्त विधान!
भारत विरुद्ध बांगलादेश मालिका कधीपासून सुरू होणार? कोणत्या चॅनलवर दिसतील लाईव्ह सामने?