साउथ सुपरस्टार थलापती विजयचा नवीन चित्रपट ‘गोट’ अखेर 5 सप्टेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल झाला. विजयच्या चाहत्यांच्या आणि फॉलोअर्सच्या सुरुवातीच्या प्रतिक्रियांच्या आधारे असे म्हणता येईल की, हा चित्रपट सुपरहिट झाला आहे. त्यासोबतच आता या चित्रपटासंबंधी आणखी व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये भारताचा महान क्रिकेटर एमएस धोनी याची छोटीशी झलक चित्रपटात दिसत आहे. धोनीला काही सेकंदही पाहून चाहते खूश आहेत.
एमएस धोनी ‘गोट’ चित्रपटाचा एक भाग असल्याच्या बातमीने प्रेक्षकांमध्ये खळबळ उडाली होती. दोन वेगवेगळ्या क्षेत्रातील दोन दिग्गजांना स्क्रीन शेअर करताना पाहण्यासाठी आणि आता चित्रपटातील एक दृश्य कॅप्चर करण्यासाठी आम्ही उत्सुक होतो, अशी कबुली अनेक चाहत्यांनी दिली.
इंस्टाग्रामवर एका चाहत्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये चित्रपटातील एका दृश्याचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्यामध्ये एमएस धोनी पडद्यावर दिसत आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सामन्यासाठी धोनी स्टेडियमवर उतरल्याची ही क्लिप आहे. दरम्यान, थलापती विजय बाईक ॲक्शन सीनची तयारी करताना दिसतोय. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी, गोट दिग्दर्शक व्यंकट प्रभू यांनी एक्सवर चित्रपटाचा रिलीज प्रोमो रिलीज केला होता. यामध्ये संपूर्ण चित्रपटातील काही निवडक ॲक्शन-पॅक सीन्सचा समावेश होता. जे अतिशय रंजक होते.
It’s a lifetime experience🔥. Thala😭💛.MSDian forever❤️.
MS Dhoni-Greatest Of All Time 🐐#MSDhoni𓃵 #GOATTheMovie pic.twitter.com/kmRpzGOltI— Viji Maani (@VijayanandaHeg7) September 6, 2024
एमएस धोनी याची दक्षिण भारतात मोठी क्रेझ आहे. यामुळेच त्याला थाला हे नाव देखील देण्यात आले आहे. धोनी याने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली होती. तेव्हापासून तो केवळ आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. मागील काही हंगामांपासून केवळ धोनीसाठी सर्व स्टेडियम भरलेली पाहायला मिळतात. आयपीएलच्या पुढील हंगामात तो खेळणार का? याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता मिळालेली नाही. आयपीएल रिटेन्शनवेळी याचा निर्णय होऊ शकतो. त्याने निवृत्ती घेतली तरी तो चेन्नई संघाशी जोडून राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा –
“भारतीय संघात सध्या दर्जेदार फिरकीपटू नाहीत”, वीरेंद्र सेहवागचे वादग्रस्त विधान!
भारत विरुद्ध बांगलादेश मालिका कधीपासून सुरू होणार? कोणत्या चॅनलवर दिसतील लाईव्ह सामने?
मुशीर खानचं नाव दुलीप ट्रॉफीच्या इतिहासात अजरामर, नवदीप सैनीसोबत मिळून रचला अद्भुत रेकॉर्ड!