भारतीय संघाने मागीलवर्षी बांगलादेश विरुद्ध पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळला आहे. त्यानंतर आता भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्धही दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्याची शक्यता आहे.
इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआय अहमदाबादमध्ये तयार झालेल्या नवीन सरादार पटेल स्टेडियमवर पुढीलवर्षी भारत विरुद्ध इंग्लंड संघात एक दिवस-रात्र कसोटी सामना आयोजित करण्याची शक्यता आहे. इंग्लंडचा संघ पुढीलवर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे.
नुकतीच बीसीसीआयची अॅपेक्स कौन्सिलची बैठक झाली. या बैठकीत बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह उपस्थित होते. या बैठकीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एक दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
भारतीय संघ यावर्षी डिसेंबर-जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील एक सामना दिवस-रात्र असणार आहे.
वास्तविक पहाता क्रिकेट ऑस्ट्रेलियाची भारतीय संघाबरोबर दोन दिवस-रात्र कसोटी सामने खेळण्याची इच्छा होती. पण बीसीसीआयने एक दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यासाठी मान्यता दिली. हा एक सामना ब्रिस्बेन किंवा ऍडलेड येथे खेळला जाऊ शकतो.
तसेच बीसीसीआयच्या अॅपेक्स कौन्सिलच्या बैठकीत इंग्लंडच्या भारत दौऱ्यात एक दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्याबद्दलही चर्चा झाली. तसेच हा सामना अहमाबादमध्ये बनलेल्या नवीन मोटेरा स्टेडियमवर होऊ शकतो. हे स्टेडियम जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. या स्टेडियमचे उद्घाटन 25 फेब्रुवारीला होणार आहे. या स्टेडियमची 1,10,000 एवढी प्रेक्षक क्षमता आहे.
टीम इंडियासाठी ही आहे सर्वात मोठी खुशखबर
https://t.co/8Zmm5QXrqQ#म #मराठी #cricket #TeamIndia #INDvsNZ— Maha Sports (@Maha_Sports) February 16, 2020
विराटच्या 'त्या' फोटोवर वॉशिंग्टन सुंदरने केली मजेदार कमेंट; वाचा-https://t.co/xaLnQxDT8x#म #मराठी #cricket #TeamIndia @imVkohli @Sundarwashi5
— Maha Sports (@Maha_Sports) February 16, 2020